Sankashti Chaturthi Vrat August 2021: श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 01:56 PM2021-08-24T13:56:08+5:302021-08-24T14:05:02+5:30
shravan sankashti chaturthi august 2021: श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण, शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...
भारतीय संस्कृतीत व्रतोपासना, सण-उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्यात काही ना काही व्रत, सण, उत्सव येत असतात. मात्र, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या यांना अनन्य महत्त्व आहे. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासातील एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण. श्रावणातील संकष्ट चतुर्थी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाच्या आधीची असल्याने विशेष महत्त्वाची मानली जाते. श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण, शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (Shravan Sankashti Chaturthi 2021 Date)
श्रीकृष्ण जयंती कधी आहे? जन्माष्टमी व्रत, शुभ मुहूर्त, गोकुळाष्टमीचे महात्म्य व मान्यता
श्रावण संकष्ट चतुर्थी: २५ ऑगस्ट २०२१
श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ: २४ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटे.
श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती: २५ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटे.
बुधवारी मोदकांचा नव्हे तर लाडवांचा नैवेद्य दाखवून पूर्ण करा विनायक संकष्ट चतुर्थी व्रत!
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन बुधवार, २५ ऑगस्ट २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विनायक संकष्ट चतुर्थी म्हणतात. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाला लाडवांचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. (shravan sankashti chaturthi 2021 vrat puja vidhi in marathi)
रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य
असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. तसेच श्रावणातील संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे. बुधवारी गणपतीची पूजा, उपासना, आराधना करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी श्रावणातील बुधपूजन केले जाते. यामुळे एकूणच बुधवारी आलेली श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जात आहे. (shravan sankashti chaturthi 2021 city wise chandrodaya timing)
तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ९ वाजून ०६ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ९ वाजून ०६ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिट |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०८ वाजून ५५ मिनिट |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
बीड | रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०८ वाजता ५४ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजता |
इंदौर | रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे |