तुमची साडेसाती सुरु आहे? नक्की करा शनिप्रदोष व्रत, शिव-शनि प्रसन्न; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 09:08 AM2024-08-16T09:08:53+5:302024-08-16T09:10:07+5:30

Shravan Shani Pradosh Vrat 2024 for Sade Sati: कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे? शनिप्रदोष व्रताचरणासह कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...

shravan shani pradosh vrat 2024 what to do in sade sati and some remedies know shani pradosh sade sati upay in marathi | तुमची साडेसाती सुरु आहे? नक्की करा शनिप्रदोष व्रत, शिव-शनि प्रसन्न; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

तुमची साडेसाती सुरु आहे? नक्की करा शनिप्रदोष व्रत, शिव-शनि प्रसन्न; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

Shravan Shani Pradosh Vrat 2024 for Sade Sati: प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात. व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण मास सुरू आहे. श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील त्रयोदशीला शनिप्रदोष व्रत येत आहे. १७ ऑगस्ट २०२४ रोजी शनिप्रदोष व्रत असून, ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी हे व्रत नक्की करावे, असे सांगितले जाते. 

शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. यानंतर शनिदेवाची पूजा करावी. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते.

श्रावण शनिवारी शनिप्रदोष: व्रताचरण कसे करावे? पाहा, शिवपूजनाचे महत्त्व; शिव-शनि शुभ करतील!

शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते

शनिप्रदोष व्रतात तिन्हीसांजेला शिवपूजन, शनिपूजन झाले की, हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. शनिप्रदोष व्रत मनापासून आचरल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांतीसोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, शनी देव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे.

शनिप्रदोषला काय उपाय करावेत?

मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. साडेसाती सुरू असलेल्यांनी शनिप्रदोष काळात काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे सांगितले जाते. शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे. ११ वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
 

Web Title: shravan shani pradosh vrat 2024 what to do in sade sati and some remedies know shani pradosh sade sati upay in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.