Shravan Somwar 2023: आज शेवटचा श्रावणी सोमवार, सायंकाळी न विसरता म्हणा महादेवाचे 'हे' पाच मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:00 AM2023-09-11T06:00:00+5:302023-09-11T06:00:01+5:30
Shravan Somwar 2023: ११ सप्टेंबर रोजी यंदाच्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे, दिलेले श्लोक म्हणून तुमच्या शिव उपासनेला पूर्णत्त्व द्या!
श्रावण मासातील शेवटचा आठवडा आणि विशेषतः आजचा श्रावणी सोमवार महादेवाला समर्पित करून पुढे दिलेले शिवमंत्र म्हणा आणि महादेवाला आपल्या भोळ्या भावाने आपलेसे करून घ्या!
मंत्र अतिशय सोपे आहेत, फक्त ते मनोभावे जप करणे महत्त्वाचे आहेत. केवळ आज नाही तर नामस्मरणाचा ठेवा सातत्याने जपावा!
महादेवाला प्रसन्न करणारे मंत्र
ओम नमः शिवाय
आपल्या माहितीतला तरी अतिशय परिणामकारक हा मंत्र भगवान शिवाच्या चमत्कारी मंत्रांपैकी एक आहे. असे मानले जाते की या मंत्राचा नियमित १०८ वेळा जप केल्याने व्यक्तीचे मन शांत होते. तसेच भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.
ओम नमो भगवते रुद्राय नमः
शास्त्रात या मंत्राला रुद्र मंत्र असेही म्हणतात. इप्सित मनोकामना पूर्तीसाठी हा मंत्र विशेष फलदायी ठरतो.
ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम्।
उर्वरुकमिव बंधनानमृत्योरमुखिय्य ममृतत् ||
हा मंत्र शिवाच्या शक्तिशाली मंत्रांमध्ये देखील समाविष्ट आहे. याला शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने भय, मृत्यू आणि अनिश्चितता यापासून मुक्ती मिळते.
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात्!
जीवनात सुख-शांती मिळविण्यासाठी शास्त्रात अनेक मंत्र सांगण्यात आले आहेत. शिव गायत्रीचा हा मंत्र खूप चमत्कारिक आहे. याच्या जपाने माणसाच्या जीवनात कमालीची मनःशांती मिळते.
करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसंवापराधं |
विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ॥
जर कळत नकळत झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागायची असेल तर या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात असे मानले जाते.