Shravan Vrat 2021 : 'चिरू नका-कापू नका; घेतला वसा टाकू नका' गुजरातमध्येही केलं जातं महाराष्ट्रीय व्रतासारखं व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:38 AM2021-08-16T11:38:26+5:302021-08-16T11:39:02+5:30

Shravan Vrat 2021 : गुजरात येथील धारो आठे व्रताचे वैशिष्टय असे, की महाराष्ट्रात आपण नागपंचमीच्या दिवशी चिरत कापत नाही, तसे गुजरातमध्ये आजच्या दिवशी विशेषतः कुणबी स्त्रिया गवत, भाजी पाला चिरत कापत नाहीत.

Shravan Vrat 2021: Ritual similarities between Gujrat and Maharashtra during Shravan Maas! | Shravan Vrat 2021 : 'चिरू नका-कापू नका; घेतला वसा टाकू नका' गुजरातमध्येही केलं जातं महाराष्ट्रीय व्रतासारखं व्रत!

Shravan Vrat 2021 : 'चिरू नका-कापू नका; घेतला वसा टाकू नका' गुजरातमध्येही केलं जातं महाराष्ट्रीय व्रतासारखं व्रत!

Next

'विविधतेतून एकता' दर्शवणारी आपली भारतीय संस्कृती आहे. त्याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर आजच्या दिवशी साजरे होणारे 'धारो आठे' हे व्रतच पहा ना. गुजरातमधील हे व्रत आहे गणेशपूजेचे. श्रावण शुक्ल अष्टमीला हे व्रत केले जाते. त्याचवेळेस महाराष्ट्रात दुर्वाष्टमी हे व्रत केले जाते. धारो म्हणजे दुर्वा आणि आठे म्हणजे अष्टमी. दोन्ही कडे हे व्रत मुलाबाळांच्या सौख्यासाठी केले जाते. याचा अर्थ दोन्ही प्रांतात एकच व्रत वेगळ्या पद्धतीने केले जाते. कसे ते पहा- 

प्रत्येक स्त्री ही आपल्या संसार सुखासाठी झटत असते. आयुष्य मंगलमयी जावो यासाठी ती मंगलमूर्ती गणरायची उपासना करते. हीच उपासना महाराष्ट्रात दुर्वाष्टमी या नावे करतात. आपल्या इथे गणरायाला दुर्वा वाहून पूजा करतात, तर गुजरातमध्ये दूर्वांवर गणेशमूर्ती विराजित करून पूजा करतात. निसर्गाशी नाते जोडणारी आपली परंपरा, व्रत वैकल्याच्या निमित्ताने स्त्रियांनाही निसर्गाचे सान्निध्य घडवते. 

गुजरात येथील धारो आठे व्रताचे वैशिष्टय असे, की महाराष्ट्रात आपण नागपंचमीच्या दिवशी चिरत कापत नाही, तसे गुजरातमध्ये आजच्या दिवशी विशेषतः कुणबी स्त्रिया गवत, भाजी पाला चिरत कापत नाहीत. ही त्यांच्याकडून धरणी मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत असते. आपल्याकडे भाद्रपद महिन्यात भागवत सप्ताह केला जातो, तसा गुजरातमध्ये श्रावण शुक्ल अष्टमीपासून भागवत सप्ताह सुरु होतो. 

Sawan 2021: श्रावण दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत? पाहा, पूजाविधी व व्रतकथा

आपल्या पूर्वजांनी वसुंधरेशी, धरणी मातेशी व्रत वैकल्यांच्या माध्यमातून किती सुंदर ऋणानुबंध जोडून दिला आहे. या व्रतांचे पालन केले, तर आपोआपच पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण होईल आणि निसर्गाचे संवर्धन केले जाईल. यासाठी आपल्या संस्कृतीची धोरणे समजून घेत त्याचे पालन केले, तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. यासाठी आजच्या मंगल दिनी मंगलमूर्ती गणरायाला वंदन करून आपल्याला संस्कृती, परंपरा आणि निसर्गाची सेवा आपल्याकडून घडो अशी प्रार्थना करूया. 

Web Title: Shravan Vrat 2021: Ritual similarities between Gujrat and Maharashtra during Shravan Maas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.