Shravan vrat 2023: श्रावणातल्या बुधवारी दिलेले व्रत केले असता लाभते अपार बुद्धी आणि धनसंपदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:00 AM2023-08-23T07:00:00+5:302023-08-23T07:00:02+5:30

Shravan Vrat 2023: श्रावणातल्या बुधवार आणि गुरुवारी जोडून एक व्रत केले जाते, जे केले असता अनुक्रमे बुद्धी आणि धनसंपदा लाभते, सविस्तर वाचा!

Shravan vrat 2023: Fasting on the Wednesday of Shravan brings immense wisdom and wealth! | Shravan vrat 2023: श्रावणातल्या बुधवारी दिलेले व्रत केले असता लाभते अपार बुद्धी आणि धनसंपदा!

Shravan vrat 2023: श्रावणातल्या बुधवारी दिलेले व्रत केले असता लाभते अपार बुद्धी आणि धनसंपदा!

googlenewsNext

श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालमूर्ती रेखाटून त्यांची पूजा केली जाते व दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावणी सोमवारपासून आपण जिवतीचा कागद लावतो, त्यातही बुध बृहस्पतीचे चित्र दिसते. त्यांची पूजा केली तरी चालते. हे व्रत सात वर्षे करावयाचे असते. शक्य असेल तर सात वर्षांनी व्रताचे उद्यापन करावे. 

या व्रताची कथा अशी- 

एका राजाला सात सुना होत्या. त्यांच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी सहा सुना 'आम्ही कामात आहोत, त्यामुळे आमचे हात रिकामे नाहीत' असे सांगून त्यांना घालवून देत असत. काही काळ गेल्यानंतर त्या राजाचे राज्य गेले. परिणामी बघता बघता हे ऐश्वर्य जाऊन दारिद्र्य आले. 

त्यांच्यापैकी सर्वात लहान सुनेने त्या मामा भाच्यांची योग्यता जाणली होती. तिने या मामा भाच्यांची सर्व कुटुंबीयांच्यावतीने क्षमा मागितली. पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत, म्हणून उपाय विचारला. त्यावेळी त्यांनी हे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने हे व्रत केल़े या व्रतकाळात तिच्या पतीच्या गळ्यात त्या देशातील हत्तीने अचानक फुलमाला घातली. त्यामुळे त्या राज्याच्या प्रजेने त्याला आपला राजा केले.  काही काळानंतर या सात सुना आणि त्यांचे पती कामधंदा शोधत या नव्या राज्यात आले. धाकट्याने त्यांना ओळखले मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले. धनसंपत्ती आणि बुद्धीमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते. 

धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मन:शांतीसाठी हे व्रत करावेसे वाटते, त्यांनी ते जरूर करावे. शक्य असल्यास आपल्या गुरुंचा आठव ठेवून त्यांना गुरुदक्षिणा द्यावी आणि मुलांच्या हातून त्यांच्या गुरुंना भेटवस्तू, फुल किंवा मनोभावे वंदन करण्यास सांगावे. त्यामुळे मुलांनाही या प्रथेची जाणीव होईल व परंपरेत सातत्य टिकून राहील. हा दिवस एकप्रकारे शिक्षक दिन म्हणून साजरा करता येईल. 

Web Title: Shravan vrat 2023: Fasting on the Wednesday of Shravan brings immense wisdom and wealth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.