Silver Turtle Benefits: घरात चांदीचा कासव ठेवण्याचे फायदे वाचा...; पैशाची कमतरता कधीच जाणवणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:05 PM2022-02-28T19:05:07+5:302022-02-28T19:05:41+5:30
Silver Turtle Benefits: वास्तूशास्त्रातील माहितीनुसार घरातील वस्तू व्यवस्थित आणि सुयोग्य जागी असण्यासाठीचे काही नियम आहेत. त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
Silver Turtle Benefits: वास्तूशास्त्रातील माहितीनुसार घरातील वस्तू व्यवस्थित आणि सुयोग्य जागी असण्यासाठीचे काही नियम आहेत. त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. इतकंच नव्हे, वास्तूशास्त्रात अशा काही गोष्टींचा आवर्जुन उल्लेख केला गेला आहे की ज्यांचं पालन केल्यानं घरातील आर्थिक स्थिती सुधारता येऊ शकते. वास्तूशास्त्रातील नियमांचं तंतोतंत पालन केलं गेलं तर घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. वास्तू नियमांचं पालन केल्यानं घरात सकारात्मकता निर्माण होते. सुख-शांती येते आणि घर आनंदी राहते.
वास्तूनुसार घराची मांडणी करण्यासोबतच अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाहेरून आणून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. यापैकी एक म्हणजे चांदीचा कासव. वास्तूशास्त्रातील नियमानुसार एक चांदीचा कासव घरात ठेवला तर कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही आणि शारीरिक समस्याही दूर राहतात.
आर्थिक समस्या होतात दूर
घरात पैशांची कमतरता यांसारख्या गंभीर परिस्थितीचा सामना करत असाल तर चांदीचा कासव घरात नक्की ठेवावा. वास्तूनुसार उत्तर दिशेला कासव ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी काचेचे भांडे घ्या आणि त्यात थोडे पाणी टाका. आता त्यात कासव टाका. तुम्ही पाण्याशिवाय रिकाम्या काचेच्या भांड्यातही चांदीचे कासव ठेवू शकता. यामुळे पैशाची कमतरता दूर होईल आणि पैसे कमावण्याचे नवे मार्गही सापडतील.
व्यापारात फायदा
ज्यांना व्यवसायात नुकसान होत आहे त्यांनी चांदीचा कासव नक्कीच व्यापाराच्या वास्तूमध्ये म्हणजेच कार्यालयात किंवा घरात ठेवावा किंवा चांदीच्या कासवाची अंगठी देखील घालू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार, कासव बहुतांशवेळ पाण्यात राहतो आणि या कारणास्तव ते लक्ष्मी मातेशी संबंधित असल्याचे मानले जाते. कासवाची अंगठी घालण्यापूर्वी ती कच्च्या दुधात ठेवावी आणि पूजेनंतरच घालावी.
विद्यार्थ्यांसाठीही फायदेशीर
जर तुमच्या पाल्याला अभ्यासात रस नसेल किंवा मेहनत करूनही निकाल चांगला येत नसेल तर तुम्ही यासाठी वास्तुशास्त्राची मदत घेऊ शकता. अभ्यासाच्या ठिकाणी चांदीचे कासव ठेवा. त्यामुळे मुलाचे मन शांत होईल आणि तो व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकेल, असे सांगितले जाते.