आजपासून दहा दिवस प.पू.टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले 'गंगाष्टक' स्तोत्र म्हणा आणि पावन व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:21 PM2021-06-11T14:21:12+5:302021-06-11T14:21:42+5:30

हे स्तोत्र सलग दहा दिवस म्हणून आपणही गंगेची मानसपूजा करून हा उत्सव साजरा करूया. 

Sing 'Gangashtak' hymn written by HH Tembe Swami Maharaj for ten days from today and be pure! | आजपासून दहा दिवस प.पू.टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले 'गंगाष्टक' स्तोत्र म्हणा आणि पावन व्हा!

आजपासून दहा दिवस प.पू.टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले 'गंगाष्टक' स्तोत्र म्हणा आणि पावन व्हा!

Next

ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दरवर्षी गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत गंगा नदीला परम पवित्र मानले जाते. तीच गंगा जी महाविष्णूंच्या पदकमलातून निघते आणि तिच्यात स्नान करणाऱ्याला भगवान विष्णूंच्या पायाजवळ घेऊन जाते, तिचा हा दहा दिवसांचा उत्सव.

आपल्या हातून दरदिवशी घडणाऱ्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी आपण गंगास्नान करतो. ते शक्य नसेल, तर रोजच्या आंघोळीच्या वेळी 'गंगेच यमुनेचैव' हा श्लोक म्हणून पंचनद्यांनी स्नान केल्याचे पुण्य कमावतो. या दहा दिवसांतही आपण गंगा नदीचे स्मरण, मनोभावे पूजन करून आपले पापक्षालन व्हावे अशी प्रार्थना करूया.

गंगा मातेला शरण जाण्यासाठी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजे प.पू.टेंबे स्वामी महाराजांनी प्राकृत मराठी भाषेत "गंगाष्टक" लिहिले आहे. हे स्तोत्र सलग दहा दिवस म्हणून आपणही गंगेची मानसपूजा करून हा उत्सव साजरा करूया. 

।। श्री गंगाष्टकम् ।।

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।
न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।
कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। १।।

न केव्हाही येथे सुकृतलव संपादित असे ।
न पूर्वीचे काही सुकृत पदरी भासत असे ।।
पुढेही श्रेयाची गति न च दिसे खास मज गे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। २।।

न साधूच्या संगा क्षणभरि धरी भक्ति न करी ।
सुतीर्था क्षेत्राची पदवि बरवी ती हि न धरी ।।
न देवाचे द्वारी क्षणभरि ठरे देवी सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ३।।

न केले बैसोनी क्षणभरि पुराण श्रवणही ।
कुकर्माच्या गोष्टी करूनि वय नेले सकलही ।।
कदा काळी नेणे हरिभजन तेंहि न सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ४।।

असा हां मी पापी शरण तुज आलो हरिसुते ।
तुं या वारी पापा शमवि मम तापा सुरसुते ।।
तुवां हाती घेता मग मजसी काहीच न लगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ५।।

महापापी तुझ्या अमृतजलपानेंचि तरले ।
सुकृत स्नाने गेले उपरि न च तेही उतरले ।।
असे मी ऐकोनी अयि शरण आलोचि तुज गे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ६।।

त्रितापघ्नी ऐसे निज बिरुद तूं पाळी सदये ।
त्रितापघ्नी ऐसे यशहि तव सांभाळी सुनये ।।
अये योगिध्येयें निगमगणगेये श्रितभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ७।।

महापापी नेले अससी जरी उद्धारुनी परे ।
तयाहूनी श्रेष्ठा अजि मग आई उद्धरि बरे ।।
तरीच प्रख्याती करिशी जगतीमाजि सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ८ ।।

Web Title: Sing 'Gangashtak' hymn written by HH Tembe Swami Maharaj for ten days from today and be pure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.