Solar Eclipse 2021: सन २०२१ मधील शेवटचे सूर्यग्रहण: ग्रहणाचे वैशिष्ट्य काय? पाहा, वेध, मध्य, मोक्ष वेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:35 PM2021-11-29T20:35:55+5:302021-11-29T20:37:07+5:30

Solar Eclipse 2021: डिसेंबरमध्ये होत असलेले खग्रास सूर्यग्रहण कधी होणार आहे? सूर्यग्रहण कुठे दिसणार? जाणून घ्या ग्रहणाच्या वेळा...

solar eclipse 2021 know timing sutak kaal and important things about kartik amavasya surya grahan | Solar Eclipse 2021: सन २०२१ मधील शेवटचे सूर्यग्रहण: ग्रहणाचे वैशिष्ट्य काय? पाहा, वेध, मध्य, मोक्ष वेळा

Solar Eclipse 2021: सन २०२१ मधील शेवटचे सूर्यग्रहण: ग्रहणाचे वैशिष्ट्य काय? पाहा, वेध, मध्य, मोक्ष वेळा

googlenewsNext

कार्तिक पौर्णिमेला तब्बल ५८० वर्षानंतरचे मोठे आंशिक चंद्रग्रहण झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कार्तिक अमावास्येला सन २०२१ मधील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. वास्तविक पाहता, जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. तसेच अमावास्या जर राहू किंवा केतू यांच्या सान्निध्यात सूर्य असताना घडली, तरच सूर्यग्रहण घडते. राहू व केतू यांना विलोमगती आहे. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण लागत नाही, असे सांगितले जाते. डिसेंबरमध्ये होत असलेले खग्रास सूर्यग्रहण कधी होणार आहे? सूर्यग्रहण कुठे दिसणार? जाणून घेऊया ग्रहणाच्या वेळा... (solar eclipse december 2021)

धार्मिकदृष्ट्या सूर्यग्रहणाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. ग्रहणानंतर दानाचे महत्त्वही पुराणांमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच ग्रहणात काही पथ्ये पाळावी लागतात, त्याबाबतचे विस्तृत विवेचन धार्मिक ग्रंथ, पुराण कथांमध्ये आढळून येते. डिसेंबर महिन्यात कार्तिक अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण ०४ डिसेंबर २०२१ रोजी लागणार आहे. (solar eclipse december 2021 timing)

सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहणाची सुरुवात: ०४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजून ५९ मिनिटे.

खग्रास प्रारंभ: ०४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३३ मिनिटे.

सूर्यग्रहणाचा मध्य: ०४ डिसेंबर रोजी दुपारी ०१ वाजून ०४ मिनिटे.

खग्रास समाप्ती: ०४ डिसेंबर रोजी दुपारी ०१ वाजून ३५ मिनिटे. (solar eclipse december 2021 sutak kaal)

सूर्यग्रहण समाप्ती: ०४ डिसेंबर रोजी दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटे.

कुठे दिसेल कार्तिक अमावास्येचे सूर्यग्रहण

डिसेंबर महिन्यात लागणारे सन २०२१ मधील सूर्यग्रहण केवळ ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेच्या दक्षिण भागात, नाम्बिया, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि अंटार्टिका या भागातच पाहता येऊ शकेल. यासह कॅनबरा, मेलबर्न, विक्टोरिया या भागातही पाहता येऊ शकेल. कार्तिक अमावास्येला लागणाऱ्या ग्रहणावेळी सूर्य वृश्चिक राशीत विराजमान असेल. आताच्या घडीला या वृश्चिक राशीत केतु विराजमान आहे. तसेच हे सूर्यग्रहण अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रावर लागणार आहे. विशेष म्हणजे ग्रहणावेळी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह वृश्चिक राशीत असतील. भारतात मात्र, ०४ डिसेंबर रोजी कार्तिक अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे वेदादी आणि अन्य नियम पाळू नये, असे सांगितले जाते. 
 

Web Title: solar eclipse 2021 know timing sutak kaal and important things about kartik amavasya surya grahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.