Solar Eclipse 2022: आजचा ग्रहणकाळ कोणासाठी ठरणार शुभ? कोणती पाळावीत पथ्य आणि कशी करावी उपासना? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:53 AM2022-10-25T09:53:39+5:302022-10-25T09:54:39+5:30

Solar Eclipse 2022: दिवाळीत सूर्यग्रहण लागल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न, संभ्रम निर्माण झालेत, ते दूर करण्यासाठी ही सविस्तर माहिती!

Solar Eclipse 2022: For whom will today's eclipse be auspicious? What diet to follow and how to worship? Find out! | Solar Eclipse 2022: आजचा ग्रहणकाळ कोणासाठी ठरणार शुभ? कोणती पाळावीत पथ्य आणि कशी करावी उपासना? जाणून घ्या!

Solar Eclipse 2022: आजचा ग्रहणकाळ कोणासाठी ठरणार शुभ? कोणती पाळावीत पथ्य आणि कशी करावी उपासना? जाणून घ्या!

googlenewsNext

>> हृषीकेश श्रीकांत वैद्य 

यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या २५ ऑक्टोबर , मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आहे . हे ग्रहण पूर्ण भारतात  दिसणार आहे . हे सूर्यग्रहण भारतात ग्रस्तास्त दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाईल . त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही . म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा .

ग्रहणाचा स्पर्श :- दुपारी १६:४९
ग्रहण मध्य :- दु .१७:४३
ग्रहण मोक्ष ( सूर्यास्त ) :- संध्याकाळी १८:०८ 
ग्रहणाचा पर्वकाल:- १ तास १९ मिनिटे राहील .

ग्रहणाचे वेध
ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून लागले असून सशक्त व्यक्तींनी सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामधे भोजन करू नये . पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण ४:४९ ते सायंकाळी ६:०८ पर्यंत खाणे, पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग ही कर्मे, मूव्ही बघणे, मोबाईल, TV बघणे ,  ई. करू नये.

ग्रहणातील कृती
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे , पर्व काळामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम , दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे . ग्रहण मोक्षानंतर पुन्हा स्नान करावे.

ग्रहणाचे फळ
वृषभ , सिंह , धनु , मकर या राशींना शुभ फल 
मेष , मिथुन , कन्या , कुंभ या राशींना मिश्रफल 
कर्क , तुला , वृश्चिक व मीन या राशींना अनिष्ट फल आहे .
ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये .

Web Title: Solar Eclipse 2022: For whom will today's eclipse be auspicious? What diet to follow and how to worship? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.