Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 04:25 PM2024-09-27T16:25:54+5:302024-09-27T16:26:18+5:30

Solar Eclipse 2024: यावर्षी पितृ अमावस्येला अर्थात २ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आहे जाणून घ्या त्यासंबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी!

Solar Eclipse 2024: How and Who Will the Solar Eclipse Affect? What diet should be followed? Read on! | Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!

Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!

या १५ दिवसांच्या आत, वर्षातील दुसरे आणि शेवटचे ग्रहण होणार आहे, जे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण झाले होते. आता सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) ग्रहण पितृ अमावस्येला (Sarva Pitru Amavasya 2024) आणि नवरात्रीच्या (Navratri 2024) एक दिवस आधी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२४ रोजी असणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ६ तास ४ मिनिटे असेल. त्यासंबंधी गोष्टी सविस्तर जाणून घ्या. 

सतत ग्रहण लागणे शुभ नाही

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप महत्त्व आहे. लागोपाठ दोन ग्रहण होणे किंवा होणे शुभ मानले जात नाही, ग्रहण दिसणाऱ्या देशांतील लोकांना नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि देशाच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. 

ग्रहणाचे नियम कोणासाठी?

२ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिका, उत्तर आणि पश्चिम अंटार्क्टिकाच्या पश्चिम सागरी क्षेत्रामध्ये स्पष्टपणे दिसेल. ग्रहणाशी संबंधित जे काही यम नियम असतील ते त्या देशातील लोकांनी पाळले पाहिजेत. भारतातून हे ग्रहण दिसणार नसले तरी ग्रहणाचा प्रभाव सर्व ठिकाणी जाणवेल. 

या राशीच्या लोकांनी सतर्क राहावे

कणकाकृती सूर्यग्रहण कन्या आणि हस्त नक्षत्रावर पडेल.  ग्रहण प्रभावित देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनी ग्रहणकाळात ग्रहणाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.  ग्रहणाच्या प्रभावामुळे हस्त नक्षत्र आणि कन्या राशीच्या लोकांना आजाराला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे या लोकांनी कोणत्याही स्थितीत ग्रहण न पाहणे चांगले! भारतात ग्रहण दिसणार नसले तरी कन्या राशीच्या लोकांनी ग्रहण काळात न झोपता ईश्वर स्मरण करावे. 

ग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार, हे खंडग्रास सूर्यग्रहण रात्री ९:१३ मिनिटांनी सुरु होऊन  स्पर्श करेल आणि  पहाटे ३: १७ मिनिटांनी संपेल. 

ग्रहण काळातील पथ्य 

ग्रहण काळात झोपू नये असे म्हणतात, परंतु सूर्यग्रहण सुरु होत असताना आणि संपताना भारतात रात्र असल्याने झोपणे स्वाभाविक आहे. तसेच ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने इतर कोणतेही पथ्य न पाळता ईश्वर स्मरण ठेवून विश्वकल्याणाची प्रार्थना करणे एवढेच पथ्य सर्व राशीच्या लोकांनी पाळायला हवे. 

Web Title: Solar Eclipse 2024: How and Who Will the Solar Eclipse Affect? What diet should be followed? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.