Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:14 PM2022-04-26T14:14:06+5:302022-04-26T14:15:34+5:30

Solar Eclipse 2022: खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? भारतातील ग्रहणाची वेळ जाणून घ्या...

solar eclipse april 2022 know about date time in india and significance of surya grahan 2022 | Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

googlenewsNext

वास्तविक पाहता ग्रहण ही वैज्ञानिक घटना आहे. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहण विशेष मानले जाते. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असतात, अशी मान्यता आहे. संपूर्ण एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा मानला गेला. सन २०२२ चे पहिले ग्रहण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे असणार आहे. ग्रहणाची तारीख काय, भारतात ग्रहण दिसणार का, ग्रहणाचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया... (Solar Eclipse April 2022)

सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी आहे. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ०७ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. भारतात रात्रीची वेळ असल्यामुळे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे यासाठीचा सूतक काळ आणि अन्य बंधने पाळण्याची गरज नाही. नित्यनेमाचे धार्मिक विधी, इतर कार्ये केली जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण दक्षिण-पश्चिम अमेरिका, प्रशांत महासागर आणि अंटार्टिक क्षेत्रात पाहायला मिळू शकेल. (Solar Eclipse April 2022 Date and Time in India)

यंदाचे पहिले ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात. कंकणाकृती हेदेखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे लागणार आहे, हे सांगितले जाते.

ग्रहणानंतर स्नानाचे महत्त्व

ग्रहणानंतरच्या स्नानाला विशेष महत्त्व असते, असे सांगितले जाते. ग्रहणानंतर शक्य असल्यास गंगा नदीत जाऊन स्नान करावे असे म्हटले जाते. ग्रहणानंतरचे गंगास्नान अतिशय शुभ मानले गेले आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही याला महत्त्व असल्याचे सांगितले जाते. तसेच या दिवशी लवंग आणि कापराचा उपाय उपयुक्त मानला गेला आहे. लवंग आणि कापराचा वापर करून धूप केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते आणि ग्रहणातील प्रतिकूल प्रभावाचा नाश होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 
 

Web Title: solar eclipse april 2022 know about date time in india and significance of surya grahan 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.