Somavati Amavasya 2024: यंदाची सोमवती अमावस्या आहे खूपच खास; 'हे' नियम अवश्य पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:00 AM2024-04-02T07:00:00+5:302024-04-02T07:00:01+5:30
Somvati Amavasya 2024: पितृदोषातून मुक्ती मिळावी म्हणून सोमवती अमावस्येला ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय नक्की करा.
सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. सनातन धर्मामध्ये सोमवती अमावस्येबाबत अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या वर्षातील पहिली अमावस्या ८ एप्रिल २०२४ रोजी येत आहे. या दिवशी पूजेवर अधिक भर द्यावा, कारण नकारात्मक शक्ती अधिक बलवान असतात, असे म्हटले जाते.
यंदा ८ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे. या दिवशी (सोमवती अमावस्या २०२४) पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने ते मोक्ष प्राप्त करतात. तसेच त्यांचा आशीर्वादही मिळतो. पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी. तसेच ज्योतिषशास्त्राने दिलेले नियमही पाळावेत.
सोमवती अमावस्येचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे. हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे. अनेक लोक या दिवशी पितृ तर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. याशिवाय त्यांचा आशीर्वादही मिळतो. पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी.
सोमवती अमावस्या नियम
- हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो.
- भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात.
- या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात.
- या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते.
- या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्याभोवती ७ वेळा प्रदक्षिणा घाला.
- या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा.
- महादेवाला अभिषेक करा.
- सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
- या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते.