Somvati Amavasya 2022 : सोमवती अमावस्येला करा पितरांची तसेच तुळशीची पूजा; वाचा सविस्तर पूजा विधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:47 PM2022-05-28T12:47:17+5:302022-05-28T12:47:39+5:30

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्या, शनी जयंती आणि सिद्धी योग या एकत्रित मुहूर्तावर केलेली पितृपूजा अधिक लाभदायी ठरेल.

Somvati Amavasya 2022: Worship of Pitras and Tulsi on Somvati Amavasya; Read detailed worship rituals! | Somvati Amavasya 2022 : सोमवती अमावस्येला करा पितरांची तसेच तुळशीची पूजा; वाचा सविस्तर पूजा विधी!

Somvati Amavasya 2022 : सोमवती अमावस्येला करा पितरांची तसेच तुळशीची पूजा; वाचा सविस्तर पूजा विधी!

googlenewsNext

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्येला चंद्र दर्शन होत नाही. तिलाच दर्श अमावस्या असेही म्हणतात. ३० मे रोजी सोमवती अमावस्या आहे. तसेच या दिवशी शनी जयंती आणि सिद्धी योग आहे. शनी देवांना ज्येष्ठांची सेवा विशेष भावते. तसेच दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते. म्हणून सोमवती अमावस्येला  सिद्धी योगाच्या मुहूर्तावर केलेली पितृपूजा विशेष  लाभ देईल. 

सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :
सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते.  तुळशीला हरिप्रिया असेदेखील संबोधले जाते. म्हणजेच हरी आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा करा असे सांगितले जाते. 

सोमवती अमावस्येचे महत्त्व :
सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

पूजेचा विधी: 
सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करून शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे. 

पूजेचा शुभ मुहूर्त :
अमावस्या तिथि: ३० मे, सोमवार
सोमवती अमावस्येचा प्रारंभ: २९ मे दुपारी २. ५५ मिनिटांपासून 
सोमवती अमावस्येचे चे समापन: ३० मे दुपारी ४.५९ मिनिटांपर्यंत 

Web Title: Somvati Amavasya 2022: Worship of Pitras and Tulsi on Somvati Amavasya; Read detailed worship rituals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.