Somvati Amavasya 2023: आज सोमवती अमावस्येनिमित्त करा 'हे' छोटेसे काम, मिळेल सगळ्या समस्यांपासून आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:55 AM2023-02-20T11:55:16+5:302023-02-20T11:55:42+5:30

Somvati Amavasya 2023: अमावास्येला चंद्राची अनुपस्थिती आणि सोमवारी ही तिथी आल्याने चंद्र आणि महादेवाच्या पूजेला आज विशेष महत्त्व आहे!

Somvati Amavasya 2023: On Somvati Amavasya Do 'This' Small remeady Today, Get Relief From All Problems! | Somvati Amavasya 2023: आज सोमवती अमावस्येनिमित्त करा 'हे' छोटेसे काम, मिळेल सगळ्या समस्यांपासून आराम!

Somvati Amavasya 2023: आज सोमवती अमावस्येनिमित्त करा 'हे' छोटेसे काम, मिळेल सगळ्या समस्यांपासून आराम!

googlenewsNext

आज २० फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या आहे. ही तिथी सोमवारी आल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हटली जाणार आहे. रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो. त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसेच सोमवारी महादेवाची प्रार्थना आपण करतोच, जोडीला अमावस्या आल्याने आजच्या दिवशी चंद्राची आणि महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. ती कशी करायची ते जाणून घेऊ. 

आज सायंकाळी सूर्यास्तानंतर शुचिर्भूत होऊन देवापाशी दिवा लावावा. उदबत्ती ओवाळावी. महादेवाची आरती म्हणावी. त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी. त्यानंतर महादेवाला पांढरे फुल आणि बेल वाहावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशी जवळ चंद्रासाठी एक फुल अर्पण करावे. ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन्ही स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे. या दोन्ही स्तोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांमध्ये गती मिळू लागते आणि अडचणींवर मात करण्याचे नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीदेखील काही अडचणीत असाल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला हा तोडगा जरूर करून बघा!

ज्योतिषशास्त्रानुसार, वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्त्रोतांचा उल्लेख आहे. या स्रोतांच्या शुभ उच्चारणाने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. शिवाष्टकम स्रोत आणि चंद्र स्त्रोत जाणून घ्या.

शिवाष्टकं स्तोत्रम्

प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजाम् ।
भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
गले रुण्डमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालम् ।
जटाजूटभङ्गोत्तरङ्गैर्विशालं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
मुदामाकरं मण्डनं मण्डयन्तं महामण्डल भस्मभूषधरंतम् ।
अनादिह्यपारं महामोहहारं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
तटाधो निवासं महाट्टाट्टहासं महापापनाशं सदासुप्रकाशम् ।
गिरीशं गणेशं महेशं सुरेशं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
गिरिन्द्रात्मजासंग्रहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा सन्नगेहम् ।
परब्रह्मब्रह्मादिभिर्वन्ध्यमानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदाम्भोजनम्राय कामं ददानम् ।
बलीवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
शरच्चन्द्रगात्रं गुणानन्द पात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रम् ।
अपर्णाकलत्रं चरित्रं विचित्रं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
हरं सर्पहारं चिता भूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारम् ।
श्मशाने वदन्तं मनोजं दहन्तं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
स्तवं यः प्रभाते नरः शूलपाणे पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः ।
स पुत्रं धनं धान्यमित्रं कलत्रं विचित्रं समासाद्य मोक्षं प्रयाति ॥

चंद्र स्तोत्रम्

श्वेताम्बर: श्वेतवपु: किरीटी, श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहु: ।
चन्द्रो मृतात्मा वरद: शशांक:, श्रेयांसि मह्यं प्रददातु देव: ।।
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम ।
नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम ।।
क्षीरसिन्धुसमुत्पन्नो रोहिणी सहित: प्रभु: ।
हरस्य मुकुटावास: बालचन्द्र नमोsस्तु ते ।।
सुधायया यत्किरणा: पोषयन्त्योषधीवनम ।
सर्वान्नरसहेतुं तं नमामि सिन्धुनन्दनम ।।
राकेशं तारकेशं च रोहिणीप्रियसुन्दरम ।
ध्यायतां सर्वदोषघ्नं नमामीन्दुं मुहुर्मुहु: ।।

Web Title: Somvati Amavasya 2023: On Somvati Amavasya Do 'This' Small remeady Today, Get Relief From All Problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.