सोमवती अमावस्या: शेवटचा श्रावणी सोमवार आणि सातूची शिवामूठ; त्रिवेणी योगाचा घ्या लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 07:00 AM2024-08-31T07:00:00+5:302024-08-31T07:00:02+5:30

shravani Somvar 2024: श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जुळून आलेल्या त्रिवेणी योगावर शिवामूठ वाहायला विसरु नका; वाचा योग्य पद्धत आणि पूजा विधी!

Somvati Amavasya: Last Shravani Monday and Sivamuth of Satu; Take advantage of triveni yoga! | सोमवती अमावस्या: शेवटचा श्रावणी सोमवार आणि सातूची शिवामूठ; त्रिवेणी योगाचा घ्या लाभ!

सोमवती अमावस्या: शेवटचा श्रावणी सोमवार आणि सातूची शिवामूठ; त्रिवेणी योगाचा घ्या लाभ!

२ सप्टेंबर रोजी श्रावण मासाची अखेर अर्थात श्रावण अमावस्या (Shravan Amavasya 2024) आहे. ती सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणूनही ओळखली जाईल. श्रावण मास महादेवाचा, त्यात सोमवारीही त्याचाच आणि भर सोमवती अमावस्येची! या त्रिवेणी योगाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील माहिती सविस्तर वाचा. 

श्रावण सोमवारी (Shravan Somvar 2024) आपण शिवामूठ वाहतो. आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे! त्यात पु्हा पार्वतीमातेचे पतीराज. शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी `गौरीहार' पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठीची (Shivamuth 2024) कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल, असे मत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर मांडतात. यंदा सोमवती अमावस्येचा सोमवार धरून पाच श्रावणी सोमवार होत आहेत. आधीच्या चार शिवामूठ त्या त्या सोमवारी वाहून झाल्या असतील, नसतील तरीही शेवटच्या सोमवारी शिवामूठ चुकवू नका. त्यात मूठभर सातू अर्पण करायचे आहेत. 

सातू : ओट्स, गहू, राई आणि तांदूळ यांसारखी धान्ये आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात कारण संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये प्रथिने, फायबर, ब जीवनसत्त्वांसह लोह, जस्त यांसारख्या खनिजांचाही समावेश होतो. यापैकी एक धान्य आहे बार्ले. 

सातू हे एक साधे धान्य आहे जे आपल्यापैकी बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असते, तरीही आपल्यापैकी फार कमी लोकांना त्याचे आरोग्य आणि सौंदर्य फायदे माहित आहेत. त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, फायबर जास्त असते आणि जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक असतात. असे पौष्टिक धान्य ज्याच्या कृपेने मिळाले त्या महादेवाला, शिवाय जे गरजू आहेत त्यांनाही संसाराला पूरक धन धान्य देता येईल.  

सोमवती अमावस्या पूजा विधी :

सायंकाळी सूर्यास्तानंतर शुचिर्भूत होऊन देवापाशी दिवा लावावा. उदबत्ती ओवाळावी. महादेवाची आरती म्हणावी. त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी. त्यानंतर महादेवाला पांढरे फुल आणि बेल वाहावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशी जवळ चंद्रासाठी एक फुल अर्पण करावे. ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन्ही स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे. या दोन्ही स्तोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांमध्ये गती मिळू लागते आणि अडचणींवर मात करण्याचे नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीदेखील काही अडचणीत असाल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला हा तोडगा जरूर करून बघा!

ज्योतिषशास्त्रानुसार, वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्त्रोतांचा उल्लेख आहे. या स्रोतांच्या शुभ उच्चारणाने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. शिवाष्टकम स्रोत आणि चंद्र स्त्रोत जाणून घ्या.

शिवाष्टकं स्तोत्रम्

प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजाम् ।
भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
गले रुण्डमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालम् ।
जटाजूटभङ्गोत्तरङ्गैर्विशालं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
मुदामाकरं मण्डनं मण्डयन्तं महामण्डल भस्मभूषधरंतम् ।
अनादिह्यपारं महामोहहारं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
तटाधो निवासं महाट्टाट्टहासं महापापनाशं सदासुप्रकाशम् ।
गिरीशं गणेशं महेशं सुरेशं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
गिरिन्द्रात्मजासंग्रहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा सन्नगेहम् ।
परब्रह्मब्रह्मादिभिर्वन्ध्यमानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदाम्भोजनम्राय कामं ददानम् ।
बलीवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
शरच्चन्द्रगात्रं गुणानन्द पात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रम् ।
अपर्णाकलत्रं चरित्रं विचित्रं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
हरं सर्पहारं चिता भूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारम् ।
श्मशाने वदन्तं मनोजं दहन्तं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
स्तवं यः प्रभाते नरः शूलपाणे पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः ।
स पुत्रं धनं धान्यमित्रं कलत्रं विचित्रं समासाद्य मोक्षं प्रयाति ॥

चंद्र स्तोत्रम्

श्वेताम्बर: श्वेतवपु: किरीटी, श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहु: ।
चन्द्रो मृतात्मा वरद: शशांक:, श्रेयांसि मह्यं प्रददातु देव: ।।
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम ।
नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम ।।
क्षीरसिन्धुसमुत्पन्नो रोहिणी सहित: प्रभु: ।
हरस्य मुकुटावास: बालचन्द्र नमोsस्तु ते ।।
सुधायया यत्किरणा: पोषयन्त्योषधीवनम ।
सर्वान्नरसहेतुं तं नमामि सिन्धुनन्दनम ।।
राकेशं तारकेशं च रोहिणीप्रियसुन्दरम ।
ध्यायतां सर्वदोषघ्नं नमामीन्दुं मुहुर्मुहु: ।।

Web Title: Somvati Amavasya: Last Shravani Monday and Sivamuth of Satu; Take advantage of triveni yoga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.