स्वप्नात पैसे दिसणं याचा अर्थ काय? तुमचं भाग्य बदलुही शकतं...पाहा स्वप्नशास्त्र काय सांगते?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 09:07 PM2022-07-24T21:07:27+5:302022-07-24T21:10:23+5:30
आपण स्वप्नात जे पाहतो त्याचा आपल्या वास्तविक जीवनाशी नक्कीच काहीतरी संबंध असतो. स्वप्ने आपल्याला येणाऱ्या भविष्याची झलक देतात, असेही म्हटले जाते. स्वप्नशास्त्रात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
गाढ झोपेत असताना स्वप्न पडणे ही सर्वसामान्य बाब आहे. स्वप्ने ही कशीही असू शकतात? काही लोकांना चांगली स्वप्ने पडतात, तर काहींना वाईट स्वप्ने पडतात. स्वप्नशास्त्र सांगते की, आपण स्वप्नात जे पाहतो त्याचा आपल्या वास्तविक जीवनाशी नक्कीच काहीतरी संबंध असतो. स्वप्ने आपल्याला येणाऱ्या भविष्याची झलक देतात, असेही म्हटले जाते. स्वप्नशास्त्रात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना पैशाशी संबंधित स्वप्ने पडतात. पैशाशी संबंधित स्वप्नांचा काय अर्थ असतो, याबाबत भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी News 18 हिंदीला माहिती सांगतली आहे.
स्वप्नात पैसे मिळणे -
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळताना किंवा कोणी तुम्हाला पैसे किंवा नोट देताना दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. असे मानले जाते की, या प्रकारचे स्वप्न भविष्यातील आर्थिक लाभाचे संकेत देते. तसेच, हे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचेही लक्षण असू शकते.
स्वप्नात लॉटरी लागणे -
जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात लॉटरी जिंकण्याचे स्वप्न पाहिले, ज्यामध्ये त्याने भरपूर पैसे जिंकले आहेत, तर यावरून हे सूचित होते की, तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचते.
रस्त्यात पैसे मिळाल्याचे स्वप्न -
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात वाटेत पडलेले पैसे सापडल्याचे दिसले, तर हे स्वप्न तुमच्यासाठी सकारात्मक असेल. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. यामुळे भविष्यात तुमची आर्थिक अडचण दूर होईल आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील.
स्वप्नात पैसे गमावणे -
स्वप्नात पैसे गमावणे किंवा जुगारात पैसे गमावणे हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, आपण सतत आपला आत्मविश्वास गमावत आहात किंवा अशी एखादी महत्त्वाकांक्षा आहे, जी बर्याच काळापासून अपूर्ण आहे. या व्यतिरिक्त, या स्वप्नाचा आणखी एक अर्थ असा असू शकतो की सामान्य जीवनात कोणीतरी तुम्हाला पैशाच्या बाबतीत फसवू शकते.
स्वप्नात पैसे चोरणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात पैसे चोरत असाल किंवा तुमचे पैसे चोरीला गेले तर तुम्हाला वास्तविक जीवनात खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचा पार्टनर तुमच्या व्यवसायात किंवा एखाद्या प्रकल्पात तुमची फसवणूक करणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल तर तुम्ही बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देणे सुरू केले पाहिजे.