तणावमुक्तीचे साधन सकारात्मक विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 06:27 PM2020-05-23T18:27:13+5:302020-05-23T18:27:35+5:30

तणावापासून मुक्ती ही मनुष्याला उर्जावान, अधिक शक्तीशाली, आत्मविश्वासी व सदा विजयी बनवते.

Stress Relief Positive Thoughts! | तणावमुक्तीचे साधन सकारात्मक विचार!

तणावमुक्तीचे साधन सकारात्मक विचार!

googlenewsNext

तणावमुक्तीचे सहज साधन आहे सकारात्मक विचार, सदैव सकारात्मक विचार करण्याची सवय जर आपण लावून घेतली. तर कुठल्याही परिस्थितीत तणाव निर्माण होणार नाही. तणावाचे मुख्य कारण आहे, नकारात्मक विचार, जेव्हा मनामध्ये नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते. सदा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे आणि सकारात्मक विचारांचा वास्तविक स्त्रोत आहे, आध्यात्मिकता. वर्तमान कलीयुगात जर आपल्याला सुखी, समाधानी व स्वस्थ जीवन जगायचे असेल तर आध्यात्मिक ज्ञान घेणे अनिवार्य आहे. आध्यात्मिकता म्हणजे आपण कोण?, कोठून आलो?, कुठे जायचे आहे?, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे?, जीवनात समस्या काय येतात?, आपला परमात्म्याशी काय संबंध आहे?, अशा अनेक गोष्टींविषयीचे यथार्थ ज्ञान जाणणे याला आध्यात्मिकता असे म्हटले जाते. त्यासाठी प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाला अवश्य भेट द्या. तेथे दिल्या जाणाºया आध्यात्मिक ज्ञानाव्दारे आपण तणावापासून सहज मुक्त होतो व सुख, शांतीमय जीवन जगू शकतो. तणावापासून मुक्ती ही मनुष्याला उर्जावान, अधिक शक्तीशाली, आत्मविश्वासी व सदा विजयी बनवते.
तणावाचे भयानक दुष्पपरिणाम
जसे एखादे रबर ठराविक मर्यादेपर्यंत ताणले तर ते पुन्हा पर्ववत होते. परंतु तेच रबर जर मर्यादेपेक्षा अधिक ताणले तर तुटून जाते. त्याचप्रमाणे ताणावाने ग्रस्त व्यक्ती सुध्दा तणावाचे प्रमाण वाढल्याने जीवनालाच संपवुन टाकतो. अशा अनेक घटना आपण पाहतो. कित्येक जण तणावाच्या आहारी जावून व्यसनाच्या आहारी जातात. आपल्या संबंध-संपर्कातील व्यक्तींवर अकारण क्रोध करतात. त्यामुळे आज बºयाच ठिकाणी घराघरात दु:ख, अशांतीचे वातावरण दिसुन येते. म्हणुनच कुठल्याही परिस्थितीत मनात दिर्घकाळ तणाव राहता कामा नये.
वास्तविक सुरूवातीला तणावाचे स्वरूप छोटेसे असते. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तो वाढत जातो. ज्याप्रमाणे एखाद्या होडीला छोटेसे छिद्र असते, परंतु वेळीच डागडुजी न केल्याने त्यातून होडीत पाणी शिरज जाते. शेवटी होडी पाण्यात बुडण्याची वेळ येते. गाडीच्या टायरचे पंक्चर वेळीच काढले नाही, तर प्रवासात किती त्रास होतो हे आपण जाणतोच. तात्पर्य म्हणजे तणावाचे प्रबंधन जर वेळीच केले तर त्यामुळे होणारे भयानक दुष्पपरिणाम टाळता येतात. तसेच कितीही तणावग्रस्त परिस्थिती ही सकारात्मक विचारांच्या बळावर सहज पार करता येते.
वेळेचे प्रबंधन
आपल्याला दिवसभरात जी कामे करावयाची आहेत, ती लक्षात घेवून वेळेचे प्रबंधन करणे आवश्यक आहे. ते जर करता आले नाही तर तणाव उत्पन्नहोतो. त्यासाठी सर्वप्रथम दिवसभराच्या कामांची एक यादी बनवा. कामांचा क्रम निश्चित करा. त्यानंतर जे कार्य महत्वाचेआहे त्याला प्राधान्य द्या. एखादे काम कठीण वाटते म्हणून लांबणीवर टाकु नका. आपल्या क्षमतेवर कोणत्या कामाला किती वेळ लागेल, ते ठरवा. मुख्य म्हणजे आपला वेळ वाया घालवू नका. समय हेच जीवन आहे. जो समय सफल करतो त्यांचे जीवन हे हमखास सफल होते.
एखादे काम खुपच कठीण असेल, आपल्या आवाक्याबाहेरचे असेल तर त्यासाठी दुसºयांचा सहयोग, दुसºयांचा अनुभव अथवा दुसºयांकडून त्या कामाची माहिती करून घ्या. परंतु ते काम अवश्य पुर्ण करा.
आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार करा
समयानुसार आपल्या जीवनशैलीत परिवर्तन आवश्यक आहे. एकाच प्रकारची जीवनशैली असेल तर जीवनात नवीनता वाटत नाही. आपल्या कार्य करणाºया पध्दतीत उमंग-उत्साह, स्फुर्ती, आनंद, नवीनता हवी. तरच आपण तणावापासून दूर राहू.
म्हणुनच आपल्या दिनचर्येतील प्रत्येक कर्म वेळेवर करणे गरजेचे असते. उदा. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, भोजन वेळेवर करणे. पोषक तत्वांनी युक्त आहार घेतल्याने शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत मिळते.
आपली कार्यक्षमता ओळखून दुसºयांना सहयोग द्या
कधी कधी तणावाचे कारण आपण स्वत:च बनतो. आपली क्षमता नसताना, दुसºयांना मदतीचे आश्वासन देतो. परंतु आपण मदत करू शकत नाही. त्यामुळे स्वत:वर दबाव वाढत जाते. म्हणून आपली कार्यक्षमता ओळखा आपण ती गोष्ट करू शकतो का? आपल्याला वेळ आहे का? याचा विचार करून मगच दुसºयांना मदतीचे आश्वासन द्या. वास्तवीक दुसºयांना सहयोग देणे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला सुध्दा दुसºयांकडून सहयोग प्राप्त होतो. परंतु दुसºयांना मदत करताना आपण स्वत:च तणावग्रस्त होणार नाही, याची काळजी घ्या. समजा एखादी व्यक्ती पाण्यात बुडत आहे. परंतु आपल्याला मात्र नीट पोहता येत नाही, अशावेळी जर का त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम काय होईल? एका सोबत दोघेही बुडून मरणार. म्हणूनच आपली कार्यक्षमता ओळखून मगच दुसºयांना सहयोग द्या. अन्यथा आपण स्वत:च तणावग्रस्त होवू.
 चुकीच्या वा व्यर्थ शब्दांनी जसा तणाव उत्पन्न होतो. तसा यथार्थ वा समर्थ शब्दांनी तणाव नाहीसा देखील होतो.
मनोरंजन अथवा मनाची खुशी अत्यावश्यक
असे म्हटले जात ेकी, मन खुश तो जहान खुश’ जीवनात जसे, योग्य आहार, विहार व निद्रा यांना महत्व आहे. तसेच मनाच्या खुशीचे देखील महत्व आहे. त्यामुळे मनाला खुशी प्राप्त व्हावी यासाठी चांगल्या प्रतीचे संगीता ऐका, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा, मनाला पसंत असलेल्या चांगल्या गोष्टी करा, एखादा छंद जोपासा, आपल्या आवडीची समाज सेवा करा, ईश्वरीय ज्ञानाचे मनन चिंतन करा, दुसºयांना आनंद द्या, सर्वांशी प्रेमपुर्वक व्यवहार करा, सदैव स्वमानात रहा, दुसºयाचे केवळ गुण पहा, सर्वांविषयी मनात शुभभावना व शुभकामना ठेवा, मनाच्या विरूध्द किंवा मनाला भारी करणारे, दु:ख देणारे कोणतेही कार्य करू नका. खरे तर आपण जेवढे मनाला ईश्वरीय चिंतनामध्ये लावतो, मन्मनाभव स्थितीमध्ये राहतो, सकारात्मक चिंतन करतो, तेवढे आपोआपच मनोरंजन होते व मनाला अपार खुशीची प्राप्ती होते. आध्यात्मिक चिंतनामुळे मनाला विपरीत परिस्थितीशी लढण्याची शक्ती प्राप्त होते. मन सशक्त होते, फलस्वरूप आपण तणावापासून खुप दूर राहतो. 
वर्तमान समयी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपला दृष्टीकोन व दृष्टी सकारात्मक बनवा. आपले मन खात राहील, असे कुठलेही कर्म करू नका. विपरीत परिस्थितीला सुध्दा ईश्वरीय ज्ञान व राजयोगाच्या आधारे धैर्यता पुर्वक तोंड द्या, कुठल्याही परिस्थितीला घाबरून जावू नका कारण स्वयं ईश्वर आपल्या सोबत आहे. तसेच संगम युगाचा समय देखील कल्याणकारी आहे. त्यामुळे आपले कधीही अकल्याण होणार नाही, हा दृढविश्वास मनात बाळगा, म्हणजे तुमचे जीवन सदैव हेल्दी (स्वस्थ्य), वेल्दी (धनसंपन्न) व हॅपी (आनंदी) अनुभवता येईल.

- ब्र.कु.शकुंतला दिदी,
रायगड कॉलनी, खामगाव.

Web Title: Stress Relief Positive Thoughts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.