धर्म आणि विज्ञान या विषयावर डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी live संवाद, लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 02:16 PM2020-12-11T14:16:46+5:302020-12-11T14:17:38+5:30
आपल्याही मनात धर्म आणि विज्ञानाशी निगडित काही प्रश्न असतील, तर या live सत्रात आपणही जरूर सहभागी व्हा आणि डॉ. राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
आपण सध्या अशा युगात आहोत, जिथे आपल्याला धर्माचे पालन करावे की विज्ञानाची कास धरावी, असे मनात द्वंद्व सुरू असते. यातून मध्य म्हणून, आपण वेळोवेळी सोयीस्कर भूमिका घेतो. परंतु कोणतीही गोष्ट समजून उमजून न घेता इतर करतात म्हणून करणे, याला अंधानुकरण म्हणतात. मग ते धर्माच्या बाबतीत असो, नाहीतर शास्त्राच्या बाबतीत! प्रत्येक कृती विचारपूर्वक करत असताना त्याची सविस्तर माहिती घेणे हे नेहमीच हितावह ठरते. यासाठीच डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले लोकमत भक्ती युट्युब चॅनेलच्या माध्यमातून १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या भेटीस येत आहेत. त्यावेळेस अभिनेत्री गौरी किरण या डॉ. राजीमवाले यांच्याशी संवाद साधणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
आपल्याही मनात धर्म आणि विज्ञानाशी निगडित काही प्रश्न असतील, तर या live सत्रात आपणही जरूर सहभागी व्हा आणि डॉ. राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या.