Surya Grahan: दिवाळीच्या रात्रीच लागणार सूर्यग्रहणाचे वेध, या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 04:06 PM2022-10-24T16:06:25+5:302022-10-24T16:07:04+5:30
Surya Grahan 2022: यंदाच्या दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाचं सावट आलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रहणाचे वेध हे १२ तास आधीच सुरू होतील.
Surya Grahan 2022: यंदाच्या दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाचं सावट आलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रहणाचे वेध हे १२ तास आधीच सुरू होतील. दरम्यान, सूर्यग्रहणाचे वेध कधी लागतील आणि कधीपर्यंत असतील, याविषयीची माहिती पुढील प्रमाणे आहे.
उद्या होणारं सूर्यग्रहण हे भारतातील काही भागातून दिसणार आहे. धार्मिकदृष्ट्या सूर्यग्रहणाचं विशेष महत्त्व असतं. २५ ऑक्टोबर रोजी सुरू होणारं सूर्यग्रहण हे दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी आइसलँडपासून सुरू होईल. तसेच संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी अरबी समुद्रात समाप्त होईल. भारतामध्ये हे ग्रहण संध्याकाळी सुमारे ४ वाजून २९ मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील.
धार्मिक शास्त्रांनुसार सूर्यग्रहणाचे वेध हे १२ तास आधी सुरू होतात. भारतामध्ये सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता दिसेल. त्यामुळे त्याच्या आधी १२ तास म्हणजेच पहाटे ४ वाजल्यापासून वेध सुरू होतील.
ग्रहणाच्या वेध काळात दान आणि जाप आदींचं विशेष महत्त्व आहे. यादरम्यान पवित्र नद्या आणि सरोवरांमध्ये स्नान आदी करून मंत्रांचा जप केला जातो. या काळात मंत्रसिद्धीही केली जाते.
ग्रहणकाळात या गोष्टी करा आणि या गोष्टी टाळा
- ग्रहणाच्या काळात बाहेर पडणे टाळा. जेवढं शक्य असेल तेवढं देवाचं नामस्मरण करा. आणि मंत्रांचा जप करा.
-ग्रहणादरम्यान कुठलंही शुभ आणि मंगलकार्य करू नका. तसेच यादरम्यान मंदिर बंद ठेवा. एका ठिकाणी बसून देवाचं नामस्मरण करा.
- आपल्या राशीनुसार दान केल्या जाणाऱ्या वस्तू गोळा करा आणि ग्रहणानंतर त्या दान करा.
- गर्भवती मातांनी यादरम्यान, विशेष काळजी घ्यावी, तसेच या काळात देवाचं नामस्मरण करावं.