Surya Puja: 'या' चुका टाळल्या तर सूर्यदेवाची कायम राहील कृपा आणि तुमचे व्यक्तिमत्त्व होईल तेजस्वी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 09:14 AM2023-12-02T09:14:26+5:302023-12-02T09:15:02+5:30
Surya Puja: सुर्यपुजेला आपल्या संस्कृतीत महत्त्व आहेच, पण ज्योतिष शास्त्र सांगते रविवारी पुढील चुका टाळल्या तर कुंडलीतील रवी अर्थात सूर्याची स्थिती बळकट होते!
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते. तसेच व्यक्तीच्या कुंडलीत रवी ग्रह प्रबळ होतो.
असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने, अर्घ्य दिल्याने तसेच सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार केल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते. त्याला प्रत्येक कामात यश मिळते. ''ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा'' हा मंत्र १०८ वेळा जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पण रविवारी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया रविवारी कोणते काम टाळले पाहिजे.
सात्विक भोजन करा
रविवारी सगळे कुटुंब घरी असल्यामुळे प्रत्येक घरात काही ना काही चमचमीत बेत आखले जातात. मात्र धर्मशास्त्र सांगते, की सूर्योपासना करणाऱ्या भाविकांनी रविवारी तामसी भोजन टाळायला हवे. मद्य, मांस वगळून सात्विक भोजन करायला हवे. तसे न केल्यास सूर्योपासनेचा त्यांना काहीही लाभ होणार नाही.
सूर्यास्तानंतर मिठाचे सेवन करू नका
ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीने रविवारी मीठाचे सेवन करू नये. परंतु अळणी अर्थात मीठ नसलेले पदार्थ खाण्याची आपल्याला सवय नसल्याने निदान सूर्यास्तानंतर मीठयुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. अन्यथा कुंडलीत रवि बळ कमी पडते.
गडद रंगाचे कपडे घालू नका
रविवारी तांब्याची अंगठी घालणे टाळावे. तसेच तांब्याची खरेदीही करू नये. तसेच, निळे, काळे, हिरवे असे गडद रंगाचे कपडे घालू नये. तसेच उशिरापर्यंत झोपून न राहता सूर्योदयापूर्वीच उठून दिनचर्येची सुरुवात करा. सूर्योदयानंतर उठणे हा सूर्यदेवाचा अपमान समजला जातो.