Swami Samarth: स्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवावी, पण अंधश्रद्धा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:53 PM2021-05-05T12:53:56+5:302021-05-05T12:55:30+5:30

स्वामी समर्थ महाराजांनी एका प्रसंगात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, अशी शिकवण दिली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

swami samarth maharaj teaching faith must be kept but not superstition | Swami Samarth: स्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवावी, पण अंधश्रद्धा नाही

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवावी, पण अंधश्रद्धा नाही

googlenewsNext

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. एकूणच भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते. कोणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी देवावर श्रद्धा ठेवतो. तर कोणी दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवतो. आपल्याकडील जवळपास सर्वच संतांनी थोतांड, चुकीच्या चालिरिती यांवर जोरदार प्रहार केला आहे. सत्कर्म करण्यासह चुकीच्या रुढी, परंपरा, चालिरिती यांना तिलांजली द्यावी, असा उपदेशही संतांनी केला आहे. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांनी वेळोवेळी अंधश्रद्धा, थोतांड, बुवाबाजी यांवर आसूड ओढलेले दिसते. 

अक्कलकोटात अनेकविध ठिकाणांहून माणसे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येत असत. असेच गणपतीबुवा नामक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला आली होती. स्वामींनी त्यांना तेथून जायला सांगितले. स्वामींच्या या कृतीचे गणपतीबुवांना फार वाईट वाटले. त्याचवेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णास्वामी आलेले असतात. आपण साक्षात कृष्णाचा अवतार असल्याचे कृष्णास्वामी लोकांना भासवत असत. कृष्णास्वामीच्या गोड बोलण्याला गणपतीबुवा अगदी भूलले आणि त्यांच्या आहारी गेले.

महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा

सावधगिरी बाळगा. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊ नका, असे स्वामी नेहमी सांगत. मात्र, स्वामींची ही शिकवण गणपतीबुवा विसरले. कालांतराने गणपतीबुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला. कृष्णास्वामीवर अगाध श्रद्धा असल्याने गणपतीबुवांनी मुलाला वैद्यांकडेही नेले नाही. एकदा कृष्णास्वामीचे प्रबोधन सुरू असताना स्वामी समर्थ तिथे गेले. आपल्यासमोर स्वामी काहीच नाही, असा आविर्भाव मिरवत स्वामींचा अपमान केला जातो. स्वामींनी आपल्याशी शास्त्रार्थ करावे, असे आव्हान कृष्णास्वामी देतात. मात्र, स्वामी एकही शब्द न बोलता तेथून निघून जातात.

गावकरी कृष्णास्वामीचा जयजयकार करतात. हा सर्व प्रकार पाहून गणपतीबुवाची कृष्णास्वामीवरची श्रद्धा वाढते. यानंतर, तुम्ही मला धन, संपदा दान करा. त्याबदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल, असे कृष्णास्वामी सांगत फिरू लागतात. दुसरीकडे काही केल्या गणपतीबुवाच्या मुलाचा आजार बरा होत नाही. उलट परिस्थिती गंभीर बनते. चोळप्पा कळकळीनी त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात. मात्र, ते काहीही ऐकत नाहीत. तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज तेथे येतात. 

सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक

स्वामी गणपतीबुवांवर चिडतात आणि म्हणतात की, अरे माणसा, अजून तुला अक्कल आलेली नाही. इतके अनुभव घेऊनही चांगल्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतोस? तरीही, गणपतीबुवा काही ऐकायला तयार नसतात. मग स्वामी आपल्या साधनेच्या बळावर सर्व लोकांना कृष्णास्वामींची दुसरी बाजू दाखवतात. कृष्णास्वामी स्त्री शिष्यांसोबत नृत्य करतात. मद्यपान करतात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर मौज करताना दिसतात, असे सर्वांच्या दृष्टीस पडते. 

ती दृश्ये पाहून गणपतीबुवांसकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाडकन उघडतात. गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. स्वामींमुळे गणपतीबुवांचा मुलगाही बरा होतो. दुसरीकडे, सर्व गावकरी कृष्णास्वामीला चोप देतात. कृष्णास्वामी स्वामी महाराजांना शरण येतो आणि शरमेने मान खाली घाऊन गाव सोडतो. स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की, श्रद्धा जरूर ठेवा. पण अंधश्रद्धा ठेऊ नका.

 

Web Title: swami samarth maharaj teaching faith must be kept but not superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.