आयुष्याला सुयोग्य वळण देण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे चुकवू नये असे live सत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:32 IST2021-04-22T15:24:18+5:302021-04-22T15:32:40+5:30
२३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार ऐकण्यासाठी लोकमत भक्ती युट्युबचॅनेलला अवश्य भेट द्या!

आयुष्याला सुयोग्य वळण देण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे चुकवू नये असे live सत्र!
जगतात सगळेच, पण ज्यांच्या जगण्याला उद्दिष्ट असते, ध्येय असते, अशा लोकांचे जगणे दुसऱ्यांसाठी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ ठरतो. आपल्यालाही आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे वाटत असेल, जीवनाचे ध्येय ठरवायचे असेल, तर कशासाठी जगतो आहोत आम्ही? या प्रश्नाची उकल होणे गरजेचे आहे. एकदा का जीवनाचे ध्येय कळले, की खडतर प्रवासही ध्येयाला समर्पित केला जातो. त्या ध्येनिश्चितीसाठी प.पू. शांतिगिरीजी महाराज 'परिपक्व जीवन जगण्याचे सार' आपल्याला कथन करणार आहेत.
उत्तम समाजसेवक आणि अध्यात्मिक गुरु अशी स्वामीजींची ख्याती आहे. साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. परंतु आजही काही नतभ्रष्ट लोक हे मान्य करायला तयार नाही. त्यानंतर ही शांतिगिरीजी बाबांना अनेक प्रकारचे त्रास काही लोकांनी दिला. प्रसंगी मारायचा प्रयत्न झाला. परंतु जनार्दन बाबांनी दिव्य दृष्टी दिलेल्या शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य थांबवले नाही. या सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे.
२३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार ऐकण्यासाठी लोकमत भक्ती युट्युबचॅनेलला अवश्य भेट द्या!