Swapna Shastra: लग्नाळू मुला-मुलींनो, तुम्हाला 'ही' स्वप्न पडत असतील तर लवकरच हळद लागणार म्हणून समजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:22 PM2022-11-17T17:22:36+5:302022-11-17T17:23:01+5:30
Swapna Shastra: लग्न-संसार वेळेत व्हावा असे प्रत्येकाला वाटते, त्यासंबंधित विचार मनात घोळून या गोष्टी स्वप्नात दिसत असतील तर हे शुभ संकेत आहेत समजा!
'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असे म्हणतात. लग्नाळू मुला-मुलींना विवाह संकल्पनेवर आधारित स्वप्न पडत असणार हे नक्की. पण स्वप्न ज्योतिषात दिलेल्या ठोकताळ्यांनुसार स्वप्नात त्यांना पुढील गोष्टी दिसत असतील तर लवकरच त्यांना लग्नाची हळद लागणार अर्थात त्यांचे लग्न होणार असे त्यांनी समजायला हरकत नाही!
>> स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. वैवाहिक आयुष्य सुखाचे जाणार यासंबंधी ते संकेत आहेत. तसेच मोरपीस दिसणेदेखील शुभ असते. तुमच्या मोरपंखी आयुष्याची लवकरच सुरुवात होणार आहे, याची सूचना मिळते.
>> स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे, हे लवकरच लग्न ठरणार असल्याचे संकेत आहेत. असे स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचे प्रतीकही मानले जाते.
>> वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याचे स्वप्न पडले असता, श्रीमंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता असते.
>> स्वप्नात तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल, तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा हात धरणार आहे.
>> विवाहेच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची प्रेत यात्रा किंवा शव पाहिले, तर त्यांचे वैवाहिक जीवन कलह पूर्ण असू शकते.
>> स्वप्नात कोणाशी टोकाची भांडणे होत असतील आणि अशी स्वप्नं वारंवार दिसत असतील, तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन धोक्यात असते.
>> स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात गढून गेलेले पहात असाल, तर तुमचे वैवाहिक जीवन खडतर परंतु सुखमय व्यतीत होते.
>> स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल, तर काळजी करू नका, तुम्हाला मनपसंत जोडीदारच मिळणार आहे.
आता वरील सर्व शक्यता वाचून तुम्हाला कोणती स्वप्नं पडतात याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका. लग्नाच्या गाठी ब्रह्म देवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी, कशा, कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहीती! स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा.