देवांना फुले वाहताना 'ही' काळजी घ्या; वाचा धर्मशास्त्राने केलेल्या सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:21 PM2023-04-22T12:21:44+5:302023-04-22T12:23:48+5:30

देवांना फुले वाहताना आपण ताजी फुले वाहतो, त्याबरोबरीने कोणती पथ्य पाळायला हवीत, तेही जाणून घेऊ. 

Take 'this' care when offering flowers to the gods; Read the suggestions made by Dharmashastra! | देवांना फुले वाहताना 'ही' काळजी घ्या; वाचा धर्मशास्त्राने केलेल्या सूचना!

देवांना फुले वाहताना 'ही' काळजी घ्या; वाचा धर्मशास्त्राने केलेल्या सूचना!

googlenewsNext

रोजची देवपूजा ही फुलांशिवाय अपूर्ण वाटते. त्यामुळे आपण रोज ताजी, सुगंधी फुलं देवाला वाहतो आणि दुसऱ्या दिवशी कोमेजलेल्या फुलांचे निर्माल्य झाले की ती बदलून टाकतो. याबरोबरच देवाला फुले वाहण्यासंदर्भात धर्मशास्त्राने काही सूचना केल्या आहेत. त्याबद्दल अनिरुद्ध इनामदार लिहितात-

न शुष्कै:पूजयेद्देवं कुसुमैर्नमहीगतै:। नविशिर्णदलै:शिष्टैर्नाशुभैर्नाविकासितै:।।

पुतिगंधोग्रगंधिनी स्वल्पगंधीनीवर्जयेत्।। समित्पुष्पकुशादीनी वहंतंनाभिवादयेत् तद्धारीचैवनान्यान् द्दिनिर्माल्वंतद्भवेत्तयो: ।। 

देवाला फुले वाहताना ती फुले सुकलेली,
जमिनीवर पडलेली, कुजलेली, उमलायच्या अगोदर च्या अवस्थेतील म्हणजे कळी असताना, 
अशी फुले देवाला वाहून पूजा करू नये असे शास्त्रात सांगितले आहे.  

तसेच ज्याचा गंध फार उग्र अथवा दुर्गंध किंवा सुगंध नसलेली अशी फुले देवाला वाहू नयेत.

ज्यांच्या हातात समिधा-फुले -दर्भ आहेत अशा मनुष्यास नमस्कार करु नये व त्यांनीही दुसर्यास नमस्कार करू नये ,तसे केले असता ती सर्व पुष्प इत्यादी निर्माल्य होतात असे शास्त्र आहे. 

Web Title: Take 'this' care when offering flowers to the gods; Read the suggestions made by Dharmashastra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.