Tarot Card: आगामी काळ थोडा परीक्षेचा, पण संयम, चिकाटी आणि जिद्द कायम ठेवा; निवडा तुमचे कार्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:25 AM2024-02-03T11:25:32+5:302024-02-03T11:25:48+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार तिनापैकी एक कार्ड निवडून आपले साप्ताहिक भविष्य जाणून त्यानुसार मार्गदर्शन मिळवता येते.
>> सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
4 ते 10 फेब्रुवारी
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा कठीण असणार आहे. तुम्ही अशा परिस्थितीत अडकाल ज्यात तुम्हाला तुमच्या जागेवर पाय घट्ट रोवून उभं रहावं लागेल. काही लोक तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकाल. तुमच्या जिद्दीने नक्कीच यश मिळवू शकता.
या आठवड्यात तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची, तुमचं सर्वोत्तम देण्याची गरज आहे. काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाका. घाबरण्याची गरज नाही. स्वतःच स्वतःसाठी उभे रहा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ताकद आहे. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा असणार आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल होणार आहे. अडकलेली कामे सुटतील. तुमच्या प्रयत्नांना आणि घेतलेल्या कष्टांना गती मिळेल. इतरांना तुमची नोंद घ्यावी लागेल. योग्य मार्ग सापडेल. मागे केलेले काम मार्गी लागेल, एक प्रकारचा विजय होईल.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर तुमच्या ध्येयावर संपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही संभ्रमात विशेष करुन भावनिक गुंतागुंतीत अजिबात न अडकता तुम्ही तुमचे काम सातत्याने करण्याची गरज आहे. कोणताही कींतू परंतू मनात न ठेवता आत्मविश्वासाने पुढे चाला. दृढ निश्चय आणि दृढ संकल्पाने काम करा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी खूप पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य करण्यासाठी एका वेळी एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करा म्हणजे पुढे जाऊ शकाल.
या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, आणि त्यामध्ये पुढे वाढण्याचा प्रयत्न करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.
श्रीस्वामी समर्थ.