Tarot Card: थोडं थांबा आणि विचारांती मोठी झेप घ्या; वाचा टॅरो कार्डनुसार साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 09:03 AM2024-01-06T09:03:17+5:302024-01-06T09:03:35+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडा आणि त्यात दिलेल्या मार्गदर्शनानुसार साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
७ ते १३ जानेवारी
===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.
या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी विश्रांती आणि मध्यांतराचा असणार आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. त्यामुळे कामे संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबला आहात असं वाटेल.
या आठवड्यात तुम्हाला काम थोडं कमी करुन काही प्रमाणात विश्रांती घेण्याचा संदेश दिला जात आहे. आत्ता स्वतःला थोडं मागे ओढा, थोडा काढता पाय घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. धावाधाव थांबवा. शांतपणे काम करा. जमेल तेवढंच काम करा, दडपण घेऊ नका. वादविवाद आणि अतिवीचार पूर्णपणे टाळा. प्रकृतीकडे नीट लक्ष द्या.
नंबर ३:
हा सप्ताह काही प्रमाणात अडकलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी कुंठित झाल्यासारख्या वाटतील. पटापट काही घडणार नाही. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. काहीही करताना विलंब होण्याची शक्यता आहे. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत.
या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.
श्रीस्वामी समर्थ.