Tarot Card: आगामी काळ आश्वासक घडामोडींचा, आनंददायी घटनांचा; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 09:04 IST2024-12-14T09:03:39+5:302024-12-14T09:04:20+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: आगामी काळ आश्वासक घडामोडींचा, आनंददायी घटनांचा; वाचा टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१५ ते २१ डिसेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे वाटचाल कराल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेले उत्तर किंवा प्रतिसाद मिळेल. एका अर्थी तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. तुम्ही करत असलेली प्रार्थना किंवा उपासना यांना बळ मिळेल. आश्वासक घटना घडेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही परिस्थितीला तोंड देताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमची साधना फलित होईल असा विश्वास ठेवा. याबरोबरच काम प्रामाणिकपणे करत रहा, तुमचा पूर्ण प्रयत्न करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा, ते तुमच्या हितासाठी घडत आहेत असा विश्वास ठेवा. "सुरवंटाचेच फुलपाखरु होते" हे लक्षात ठेवा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी सोबतीने पुढे वाढण्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. घरामध्ये जोडीदाराकडून अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात साहचर्य मिळेल. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत आनंददायी घटना घडेल. साथ संगतीमुळे अवघड मार्ग सोपा होईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला एकटे राहण्यापेक्षा इतरांच्या सोबत राहणे जास्त फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीत एकटे पडू नका. तुमचे मत वेगळे असेल तरी चार लोकांच्या सांगण्याप्रमाणे वागा. एखाद्या कलेतून आनंद मिळवा. बुध्दीचा तर्क बाजूला ठेवून भावना समजून घ्या. जवळच्या व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त करुन सांगा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.