Tarot Card: आगामी आठवडा ठरेल आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम काळ; वाचा टॅरो कार्ड भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 10:24 AM2024-07-06T10:24:01+5:302024-07-06T10:24:32+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही आगामी सप्ताहाचे भविष्य जाणून घेऊ शकता. 

Tarot Card: The coming week will be a good time for financial investments; Read tarot card fortune! | Tarot Card: आगामी आठवडा ठरेल आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम काळ; वाचा टॅरो कार्ड भविष्य!

Tarot Card: आगामी आठवडा ठरेल आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम काळ; वाचा टॅरो कार्ड भविष्य!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
७ ते १३ जुलै
===============

नंबर १:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी विश्रांती आणि मध्यांतराचा असणार आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. त्यामुळे कामे संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबला आहात असं वाटेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला काम थोडं कमी करुन काही प्रमाणात विश्रांती घेण्याचा संदेश दिला जात आहे. आत्ता स्वतःला थोडं मागे ओढा, थोडा काढता पाय घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. धावाधाव थांबवा. शांतपणे काम करा. जमेल तेवढंच काम करा, दडपण घेऊ नका. वादविवाद आणि अतिवीचार पूर्णपणे टाळा. प्रकृतीकडे नीट लक्ष द्या.

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्याच्या सुधारेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्था पलीकडे जाऊन लोकसेवा करा.

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. संयम आणि धैर्याचा कस लागेल. काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. पण संयमाचे फळ शेवटी गोड मिळेल याची खात्री ठेवा.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. आर्थिक गुंतवणूक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.

श्रीस्वामी समर्थ.

संपर्क : ९५६१०९३७४०

Web Title: Tarot Card: The coming week will be a good time for financial investments; Read tarot card fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.