Tarot Card: सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:40 AM2024-08-31T10:40:48+5:302024-08-31T10:41:10+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडून तुम्हाला तुमचे आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते. 

Tarot Card: The first week of September is a bit difficult, take it easy; Read Weekly Tarot Fortune! | Tarot Card: सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१ ते ७ सप्टेंबर
===============

नंबर १:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोहोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्य सुधारेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्था पलीकडे जाऊन लोकसेवा करा.

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेले उत्तर किंवा प्रतिसाद मिळेल. एका अर्थी तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. तुम्ही करत असलेली प्रार्थना किंवा उपासना यांना बळ मिळेल. आश्वासक घटना घडेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही परिस्थितीला तोंड देताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमची साधना फलित होईल असा विश्वास ठेवा. याबरोबरच काम प्रामाणिकपणे करत रहा, तुमचा पूर्ण प्रयत्न करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा, ते तुमच्या हितासाठी घडत आहे असा विश्वास ठेवा. "सुरवंटाचेच फुलपाखरु होते" हे लक्षात ठेवा!

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. बरेच कष्ट करावे लागतील. कसलीतरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. इतरांकडून हीन वागणूक मिळू शकते. पण या सगळ्यातूनच "आजची रात्र ही उद्याच्या पहाटेची चाहूल घेऊन येते" याचा अनुभव तुम्हाला येईल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वतः संयम ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे व्यवहार टाळा. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा आहे त्यात तुम्ही तुमचं उत्तम कसं करू शकता याकडे लक्ष द्या. परोपकार  करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा. "पेराल तेच उगवेल" म्हणून आत्ता चांगलेच पेरा!

९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: The first week of September is a bit difficult, take it easy; Read Weekly Tarot Fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.