Tarot Card: पितृपक्षाचा काळ ठरणार लाभदायी, अडलेली कामे लागणार मार्गी; निवडा तुमचे टॅरो कार्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 04:18 PM2024-09-14T16:18:19+5:302024-09-14T16:19:45+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्हाला आगामी सप्ताहाचे भविष्य जाणून घेता येते.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१५ ते २१ सप्टेंबर
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. विनाकारण कोणाबद्दलही वाईट विचार करु नका. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एकंदरीत आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादे लहान ध्येय पूर्ण होईल. कलेतून किंवा छंदातून आनंद मिळेल. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. बिघडलेले संबंध सुधारतील. एकत्र येऊन एखादे कार्य पूर्ण कराल. केलेल्या कष्टाचे चीज होईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. कुटुंबाला वेळ नक्की द्या. अडलेल्याला मदत करा. सगळ्यांचा विचार करा. ध्यान उपासना करा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भावभावनांचं प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही मुख्यत्वे आनंदी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या मनाचा कौल घेऊन, बुध्दी आणि इतर व्यवहारिक गोष्टींपेक्षा मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागून चांगला अनुभव येईल. कठीण परिस्थितीसुद्धा सकारात्मकतेने हाताळू शकाल. स्वतःमध्ये समाधानी रहाल. कला क्षेत्रात चांगली प्रगती होईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही भावनांमध्ये वाहवत जात नाही आहात ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणामध्येही भावनिक दृष्ट्या अडकू नका. तुम्हाला आवडणारा एखादा छंद किंवा एखादी कला आत्मसात करा, त्यात वेळ घालवा. इतरांना पूर्ण मदत करा. तुमच्या बोलण्याने इतरांना आधार मिळू शकतो त्याप्रमाणे वागा. कृतज्ञ रहा.
९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.