Tarot Card: रथसप्तमीचा काळ आर्थिक आणि भौतिक समाधानाचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:28 IST2025-01-31T12:27:58+5:302025-01-31T12:28:21+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्हाला साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते. 

Tarot Card: The period of Rath Saptami is of financial and material satisfaction; Read your weekly tarot prediction! | Tarot Card: रथसप्तमीचा काळ आर्थिक आणि भौतिक समाधानाचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: रथसप्तमीचा काळ आर्थिक आणि भौतिक समाधानाचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२ ते ८ फेब्रुवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी सगळ्यांसोबत देवाणघेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे जाणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात. आजूबाजूला समन्वय आणि समानता साधली जाईल. एखादे बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" प्रमाणे वागा!

नंबर २:

काय घडू शकते? 
हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष एकाग्र न राहता विचलित जास्त होण्याची शक्यता आहे. हवे तसे ध्येय साध्य करायला अवघड आहे पण तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे जाणार आहात आणि हेच महत्त्वाचे आहे!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका.  पण तुम्ही मागच्या आठवड्यापेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून हा सप्ताह हलकेपणाने घालवा.

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक, आर्थिक संपन्नतेचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादं ध्येय पूर्ण होईल. आर्थिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. सगळे जण मिळून कुठल्यातरी आनंदात सहभागी होतील. ज्येष्ठ व्यक्ती किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश मिळणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. आपल्या माणसांवर किंवा आवडीच्या वस्तूवर पैसे खर्च करा, त्यात काही चूक नाही, फक्त अतिरेक नको!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

 

Web Title: Tarot Card: The period of Rath Saptami is of financial and material satisfaction; Read your weekly tarot prediction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.