Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:11 IST2025-04-19T14:10:49+5:302025-04-19T14:11:10+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: Time for the caterpillar to become a butterfly, don't waste your efforts; Read the weekly tarot fortune! | Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२० ते २६ एप्रिल
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १:

काय घडू शकते? 
हा सप्ताह तुमच्यासाठी उर्जायुक्त असणार आहे. ध्येयपूर्तीसाठी एक पाऊल पुढे टाकू शकणार आहात. झटपट घडामोडी घडू शकतात. तुमच्या आवडीच्या कामात एक प्रकारे नवीन चांगली चालना मिळेल. अडथळे येतील पण त्यावर तुम्ही कुशलतेने मात करू शकाल. तुमचा झेंडा रोवण्याचा हा काळ आहे. काही प्रवास घडू शकतात.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यावर एकाग्रपणे काम करा. लक्ष विचलित होऊ देऊ नका. इतरांना देखील घेऊन पुढे चाला. बाकीच्यांचे मत ऐकून घ्या. काही प्रमाणात तुमचं वर्चस्व दाखवा पण त्याचा अतिरेक नको. तुम्हाला आतून जे योग्य वाटतंय, जे पटतंय तेच करा. आळस अजिबात नको. वेगाने पुढची वाटचाल करा.

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेले उत्तर किंवा प्रतिसाद मिळेल. एका अर्थी तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. तुम्ही करत असलेली प्रार्थना किंवा उपासना यांना बळ मिळेल. आश्वासक घटना घडेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही परिस्थितीला तोंड देताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमची साधना फलित होईल असा विश्वास ठेवा. याबरोबरच काम प्रामाणिकपणे करत रहा, तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा, ते तुमच्या हितासाठी घडत आहेत असा विश्वास ठेवा. "सुरवंटाचेच फुलपाखरु होते" हे लक्षात ठेवा!

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. संयम आणि धैर्याचा कस लागेल. काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. पण संयमाचे फळ शेवटी गोड मिळेल याची खात्री ठेवा.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा. फळ मिळेल हे निश्चित, पण विलंब होईल. आर्थिक गुंतवणूक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.

संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: Time for the caterpillar to become a butterfly, don't waste your efforts; Read the weekly tarot fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.