Tarot Card: नाविन्यपूर्ण घडामोडींचा काळ; जाणून घ्या कसा असेल पुढचा आठवडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:17 AM2024-08-17T10:17:13+5:302024-08-17T10:17:30+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही येत्या आठवड्याचे भविष्य जाणून घेऊ शकता.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१८ ते २४ ऑगस्ट
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार आणि नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये, घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धिमत्ता आणि वैचारिक कौशल्य वापरण्याची गरज आहे. भावनेपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी निर्णयापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता. तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक सुख समृद्धी घेऊन येत आहे. तुम्हाला एखादे लहान ध्येय गाठता येईल. एखादी हवी असलेली वस्तू घेता येईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा येईल. अस्थिर परिस्थिती सुधारेल. एकंदरीत हा काळ अगदी पूर्ण नाही पण काही प्रमाणात यश देणार आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक सक्षमतेने इतरांना मदत कशी करता येईल याचा विचार करा. संकुचित वृत्ती सोडा. मन मोठे करा. सगळ्यांना सामावून घ्या. तुमच्या वर्चस्वाचा गैरवापर करू नका. "न अहंकारात परो रिपु:" म्हणजे अहंकारासारखा दुसरा शत्रू नाही हे लक्षात ठेवा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी देवाणघेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे जाणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात, चांगले आर्थिक व्यवहार होऊ शकतात. एखादे बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" प्रमाणे वागा!
९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.