Tarot Card: परीक्षेचा काळ: शांत राहा, तटस्थ राहा, येणारा काळ तुमचाच; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:42 IST2025-03-17T12:41:41+5:302025-03-17T12:42:07+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: परीक्षेचा काळ: शांत राहा, तटस्थ राहा, येणारा काळ तुमचाच; वाचा टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१७ ते २२ मार्च
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण करणार आहे. काही गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. तर काही बाबतीत अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे नवीन काही करण्याची इच्छा मावळून जाईल. अतिविचार करू नका, अन्यथा तुम्ही त्यात अडकण्याची शक्यता आहे. एक प्रकारे हा परीक्षेचा काळ आहे असे समजा. त्यात तुम्ही संयम आणि समतोल राखलात तर येणारा काळ चांगला जाईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु करु नका. मोठे निर्णय घेऊ नका. अंगावर जबाबदारी ओढवून घेऊ नका पण स्वकर्तव्याला चुकू नका. इतरांच्या बोलण्याने, इतरांच्या वागण्याने स्वतःला त्रास करुन घेऊ नका. त्याने तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल. मनाप्रमाणे काही घडले नाही तरी सुद्धा तुम्ही सकारात्मक राहून या काळातून तरून जाणे गरजेचे आहे.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. महत्त्वाचे कोर्टाचे काम होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांचे व्यवहार घडतील. पण या काळात कोणतेच काम पटकन होणार नाही. एका गोष्टीसाठी अनेक गोष्टींची गरज लागेल. प्रक्रियेला वेळ लागेल. मागे केलेल्या कर्माचे फळ मिळेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही सारासार विचार करुन वागण्याची आणि बोलण्याची गरज आहे. कोणत्याही बाबतीत घाईगडबड करु नका. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन काम करा. कोर्ट कचेरी कामात दुर्लक्ष नको. खोटेपणा सोडून सचोटीने वागा. मागे तुमच्या कडून काही चुका झाल्या असतील तर त्या खऱ्या मनाने मान्य करुन परिस्थिती स्वीकारा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक, आर्थिक समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादं लहान ध्येय पूर्ण होईल. आर्थिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. सगळे जण मिळून कुठल्यातरी आनंदात सहभागी होतील. ज्येष्ठ व्यक्ती किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. आपल्या माणसांवर किंवा आवडीच्या वस्तूवर पैसे खर्च करा, त्यात काही चूक नाही, फक्त अतिरेक नको!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.