Tarot Card: रखडलेली कामे मार्गी लागण्याचा काळ; टॅरो कार्डनुसार वाचा साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:23 AM2024-06-22T11:23:01+5:302024-06-22T11:24:02+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२३ ते २९ जून
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी दिलासादायक असणार आहे. तुमचे काम पूर्णत्वाकडे पोचण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या शिक्षकांचा, मोठ्या व्यक्तींचा आणि साथीदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. काहीतरी नवीन शिकाल आणि शिकवाल. "आधी लगीन कोंढाण्याचे" या प्रमाणे कर्तव्याला न चुकता काम केले तर समाधानकारक फळ मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला अजिबात टाळू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून तुमचे चांगले होणार आहे. नियमात बसेल असेच वागा आणि त्याप्रमाणे काम करा. जोखीम किंवा चौकटीबाहेरच्या गोष्टींना आत्ता हात घालू नका. आध्यात्मिक गुरुंची उपासना करा. प्रयत्नांना प्रार्थनेची शक्ती जोडा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे वागा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे. जर आत्ता तुम्ही निराश असाल तर या आठवड्यात ही परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टी किंवा माणसं अनुकूल होतील. काही गोष्टींना गती मिळेल, योग्य दिशा मिळेल. अडकलेले काम सुटेल. नशिबाची चांगली साथ मिळेल.
या आठवड्यात तुम्ही प्रामाणिक कष्ट करण्याची गरज आहे. आत्ता तुम्ही आनंद उपभोगत असाल तर हीच वेळ आहे दुसऱ्याला मदत करण्याची. निसर्गचक्र लक्षात ठेवा. तुम्ही चांगल्या परिस्थितीत असाल तर त्याचा अभिमान न ठेवता सत्कर्म करा आणि कोणाला दुखवू नका. वेळ कधीही सांगून परीक्षा घेत नाही हे लक्षात ठेवा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.