Tarot Card: जुलै महिन्याची सांगता कशी होणार हे ठरेल तुमच्या तीनपैकी एक कार्ड सिलेक्शनवर!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: July 22, 2023 03:29 PM2023-07-22T15:29:55+5:302023-07-22T15:32:01+5:30
Adhik Maas 2023: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेतो, त्यासाठी दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडा आणि वाचा तुमचे भविष्य!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
23 जुलै ते 29 जुलै
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत याची तयारी ठेवा. वादविवाद, स्पर्धा, मतभेद, भांडणं आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाशी तरी भांडण होऊन नुकसान होण्याचे संभवत आहे. घरामध्ये, कुटुंबामध्ये मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न आवडणारी, न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. तुम्हाला हवा तसा सहकाऱ्यांचा किंवा आप्तेष्टांचा पाठिंबा मिळणार नाही. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.
या आठवड्यात तुम्ही शांत राहायचं आहे. उग्रपणे, अविचाराने किंवा घाईघाईने कोणतेही काम करू नका किंवा निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. आपल्यापुरता विचार करा. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका, वाद किंवा भांडणं स्वतःहून ओढवून घेऊ नका. थोडाफार विरोध करा, पण अतिरेक लढायला जाऊ नका, त्यातून निष्पन्न निघेल अशी अपेक्षा ठेवू नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा. तडकाफडकी काहीही करू नका. मानसिक त्रास होत असेल तर ध्यान, मेडीटेशन, मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे यांचा आधार घ्या.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीचे प्राधान्य घेऊन येत आहे. असे प्रसंग किंवा अशा घटना घडतील ज्यात तुम्हाला तुमच्या मनापेक्षा बुद्धीचा वापर करावा लागेल. बुद्धीचातुर्य दाखवावं लागेल. मनाचं न ऐकता, डोक्याने काम करावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. तुम्हाला परखड मत ऐकून घ्यावं लागेल. कामामध्ये एक टप्पा गाठला जाईल.
तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. अगदी सचोटीने वागा, खरे बोला. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा, काहीही लपवू नका. मोठ्यांसमोर नमतं घ्या. वाद होत असेल तर मुद्दा सोडून बोलू नका, विषयापासून भरकटू नका. पक्षपात करू नका, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. स्पष्ट संवाद ठेवा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी एकच वेळी अनेक गोष्टी घेऊन येणार आहे. वेळ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. निरनिराळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आणि मन ओढलं जाईल. घर, काम, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार, तुमच्या स्वतः च्या महत्त्वाकांक्षा या सगळ्यात तुम्हाला काही न काहीतरी सहभाग घ्यावा लागेल. थोडक्यात मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही, कारण तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित नसेल. बरेच पर्याय डोळ्यासमोर येतील, बरेच मार्ग दिसतील, त्यामुळे एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमचं चित्त विचलित न होऊ देण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, आणि त्यामध्ये पुढे वाढण्याचा प्रयत्न करा. खूप वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी हात घालू नका. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. त्यामुळे तुमचं लहान ध्येय निश्चित करा आणि तेवढंच मिळवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय घेण्याचं टाळा, किंवा घ्यावा लागलाच तर भावनिक दृष्ट्या घेऊ नका, नीट स्पष्ट बुद्धीने घ्या. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका.
श्री स्वामी समर्थ.