Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:10 PM2024-06-01T12:10:17+5:302024-06-01T12:12:06+5:30
Tarot card : टॅरो कार्डननुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२ ते ८ जून
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या हिंमतीचा कस लावणारा असणार आहे. जे काही करत आहात त्यात तुमच्या धडाडीची आणि स्वबळाची परीक्षा होऊ शकते. शेवटच्या टप्प्याजवळ काहीतरी अडथळा येऊ शकतो. थोडा विरोध होऊ शकतो. पण खचू नका, प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. जिद्दीने आणि चिकाटीने पुढे चाला. विचारपूर्वक काम करा. कुठल्याही जुन्या वाईट अनुभवामुळे स्वतःचे खच्चीकरण करू नका. शरीर स्वास्थ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात हा विश्वास ठेवा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. कामामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होईल. संथ पण आश्वासक अशी वाटचाल होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात, आरोग्यात, कामात स्थैर्य लाभेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार रहा. येणाऱ्या संधीचे सोने करुन घ्या. मुंगी होऊन साखर खाऊन घ्या. आर्थिक गुंतवणूक विश्वासार्ह ठिकाणी करु शकता. स्वतः थोडा कमीपणा घ्या. लहान गोष्टींमध्ये आनंद माना. आकाशात उडायचे असेल तर आधी पाय जमिनीवर ठेवावे लागतात हे विसरु नका.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी परीक्षेचा असणार आहे. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. कामे रखडली जातील. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण हे सगळं सहन केल्यावर पुढे चांगले बदल घडतील. येणार्या पहाटेसाठी आजची रात्र गरजेचीच असते हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. एवढासा सुद्धा नियम मोडू नका. आखलेल्या चौकटीतंच वागा. जोखीम उचलू नका. व्यसनात गुंतू नका. अती तिथे माती हे लक्षात ठेवा!
श्रीस्वामी समर्थ.