डोंबिवली कीर्तन कुलातर्फे यंदा समाजभूषण पुरस्काराचे मानकरी ह.भ.प. गंगाधर बुवा व्यास!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 02:55 PM2024-01-13T14:55:09+5:302024-01-13T14:55:33+5:30
दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीत होणाऱ्या कीर्तन सप्ताहाची सांगता १४ जानेवारी रोजी पुरस्कार सोहळ्याने होणार आहे, त्याचे सविस्तर वृत्त!
डोबिवली कीर्तन कुल संस्था आणि मराठा हितवर्धक मंडळ डोबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही देवर्षि नारद कीर्तन महोत्सव ८ ते १४ जानेवारी या कालावधीत आयोजित केला होता. डोंबिवली पश्चिम येथील मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात झालेल्या या उत्सवाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उत्सवाची सांगता पुरस्कार सोहळ्याने होणार असून सर्व भाविकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
डोंबिवली कीर्तनकुल संस्था आयोजित वैकुंठवासी दत्त दासबुवा घाग, नृसिंहवाडी यांच्या स्मृतिला अभिवादन करण्याकरिता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या देवर्षि नारद कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ सोमवार दि.८/१/२०२४ रोजी सायं. ४.४५ वा. डोंबिवली कीर्तनकुल संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. सौ. अस्मिता देशपांडे आणि मराठा हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. देवेंद्र देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या स्मृती कीर्तन महोत्सवात दररोज सायं. ५ ते ६.३० या वेळेत उदयोन्मुख कीर्तनकरांची कीर्तने, रात्रौ ८ ते १० महाराष्ट्रातील जेष्ठ-श्रेष्ठ नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली होती. जसे की, वर्षा काळे, अक्षय आयरे, संपदा गोखले, आरती मुनीश्वर, संतोष पित्रे, ज्योत्स्ना गाडगीळ, किरण तुळपुले, मंदार गोखले, श्रेयस बडवे, सुखदा मुळ्ये, शरद घाग. तसेच पेटी व तबला साथ, जयंत फडके, वासुदेव रिसबूड, विवेक बर्वे, अमृता तांबे, सुशील पाठक, हर्षद कुणकवलेकर, मंगेश मुळे, तारेकश जोशी या कलाकारांनी केली.
कीर्तन महोत्सवाचा सांगता समारंभ मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवार दि. १४/०१/२०२४ रोजी सायं. ५.०० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमात दर वर्षी दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार हा.भ.प. श्री. गंगाधरबुवा व्यास यांना मा. श्री. माधवजी जोशी (लक्ष्मी नारायण ट्रस्ट संचालक) यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. सुहास सरपोतदार : ९३२२२६६६९४ / ८४२५८४२५४९