'बुडत्याला काडीचा आधार' तसा 'हताश मनुष्याला ज्योतिषशास्त्राचा आधार' असे म्हणता येईल; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:13 AM2022-11-11T11:13:57+5:302022-11-11T11:14:24+5:30

ज्योतिष शास्त्र हे पथदर्शकाची भूमिका निभावते, त्यावर सर्वस्वी अवलंबून न राहता मार्गदर्शन म्हणून या शास्त्राची नक्कीच मदत होऊ शकते!

'The support of a stick to a drowning person' can be said to be 'the support of astrology to a disappointed man'; Because... | 'बुडत्याला काडीचा आधार' तसा 'हताश मनुष्याला ज्योतिषशास्त्राचा आधार' असे म्हणता येईल; कारण...

'बुडत्याला काडीचा आधार' तसा 'हताश मनुष्याला ज्योतिषशास्त्राचा आधार' असे म्हणता येईल; कारण...

googlenewsNext

>> सौ.अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

काहीतरी महत्वाची  समस्या असल्याशिवाय कुठलाही जातक ज्योतिषाकडे जात नाही. एखाद्या गोष्टीसाठी अथक परिश्रम करूनही जर यश आले नाही तर ह्या शास्त्राचा आपले उत्तर शोधण्यासाठी आधार घ्यावासा वाटतो आणि मग त्या शास्त्राच्या जाणकाराकडे पावले वळतात .

जातकाच्या प्रश्नांचे निदान करण्यापूर्वी आपण त्याची मानसिकता समजून घेणे खूप आवश्यक असते . ती समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. जातक आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर घेवूनच आलेला असतो.  अनेकदा ठरवून सुद्धा जातक आणि ज्योतिषी ह्यात संवाद होत नाही कारण प्रश्न विचारणारा कधी प्रश्न विचारणार ह्याची वेळ विधात्याने  निश्चित केलेली असते . त्याच वेळी जातक प्रश्न विचारतो. आज प्रत्येकाला खूप बोलायचे आहे , मन मोकळे करायचे आहे पण कुणाकडे तेच समजत नाही कारण ह्या व्यावहारिक जगात माणसा माणसातील प्रेम , नात्यातील गोडवा ,विश्वास माया ओलावा कमी होत आहे.  

आपल्याकडे आलेल्या जातकाला आपण योग्य व्यक्तीकडे आलेलो आहोत ह्याची खात्री पटते तेव्हाच तो आपल्याशी त्याच्या मनातील खर्या शंका विचारतो आणि तेच खरे हितगुज . अनेक घरगुती किंवा काही गुंतागुंतीचे प्रश्न , काही नात्यातील नाजूक प्रश्न अश्या अनेक गोष्टी जातक बोलताना मग कचरत नाही कारण जातक आणि ज्योतिषी ह्यात विश्वासाचे नाते तयार होते. जातकाने आपल्याशी मनमोकळे बोलावे हि जबाबदारी ज्योतिषा चीच असते . आयुष्यात कुठलाही प्रश्न असुदे त्यातून मार्ग निघतोच ,  नव्हे तो आपण काढायचा असतो हा विश्वास जातकाला देणे महत्वाचे असते.

प्रत्येक जातकाला आपली समस्या जगातील सगळ्यात मोठी समस्या वाटत असते आणि ज्योतिषाकडे जणू अल्लौदिन चा दिवा आहे आणि तो घासला कि आपली समस्या सुटणार असा (  भाबडा ) विश्वास किंवा अपेक्षा  त्याला असते .आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी अत्यंत अधीर असणारा जातक आपला संयम कधीतरी घालवून बसतो.  इतकच नाही तर अनेकदा आपले उत्तर सुद्धा ज्योतिषाकडून त्यांना सकारात्मकच हवे असते. आपल्याला हवे तेच उत्तर समोरच्याने दिले तर आपण दिल से खुश नाहीतर आपला स्वर बदलतो हा मनुष्य स्वभाव आहे त्याला कोण काय करणार म्हणा .असो. 

आजकाल इंटरनेट च्या माध्यमातून जग जवळ आलेले आहे त्यामुळे फोन , झूम च्या माध्यमातून सुद्धा समुपदेशन करता येते . त्यामुळे जगाच्या कानाकोपर्यातून कुणाशीही कधीही संपर्क करता येणे शक्य झाले आहे .  प्रश्न विचारताना जातकाच्या मनस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अनेकदा एखाद्या आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा आजारपणाचा प्रश्न असतो ,अश्यावेळी भावूक झालेल्या जातकाला संयमाने उत्तरे देणे गरजेचे असते.  एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तर तसे नकारात्मक उत्तर पचवण्याची ताकद जातकात नसल्यामुळे ते वेगळ्या शब्दात त्याला सांगावे लागते . हीच गोष्ट संततीसाठीही आहे. अश्या अत्यंत नाजूक प्रश्नांची उत्तरे जातकाला न दुखावता देणे हे ज्योतिषासमोरचे आव्हान असते. 

आज आपण अनेक आघाड्यांवर एकच वेळी लढत असल्यामुळे नोकरी , आर्थिक स्थैर्य , घर , विवाह ,संतती ह्या गोष्टी एकत्र गुंतलेल्या आहेत . एखाद्या गोष्टीसाठी उपाय सांगा हा सगळ्यांचाच प्रश्न असतो आणि तो गैर नाही. अनेक गोष्टी आपली मानसिकता बदलून आपल्याला साध्य करता येतात . अश्यावेळी योग , मेडीटेशन उपयुक्त ठरते. पण असे आहे कि देवाने सगळ्यांना सगळे दिले नाही. म्हणूनच जगी सर्व सुखी असा कोण आहे हे म्हंटले आहे . त्यामुळे आयुष्यात विवाह योग नसेल तर हि गोष्ट मिळणार नाही हा योग नाही हे जातकाला कधीतरी स्वीकारावे लागते आणि जितका लवकर तो ती स्वीकारेल तितका लवकर सुखी होईल , नाही का? 

परदेशगमन ,आजकाल प्रत्येकालाच परदेशी जायचे वेध लागले आहेत पण तो योग आपल्या पत्रिकेत नसेल तर परदेशगमन होणार नाही. पण त्यामुळे त्यासाठी निराश न होता आहे त्या नोकरीत सुद्धा मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न का करू नये ? शेवटी आहे त्यात समाधान मानावेच लागते ,जगणे सोडून तर चालणार नाही ना .

जातकांच्या समस्या म्हणजे पूर्वकर्म आणि प्रारब्ध ह्याचा मेळ आहे. जे आहे ते आहे . काही गोष्टी नियतीला आणि सद्गुरुना सुद्धा बदलता येत नाहीत कारण ते तुमचे प्राक्तन असते त्यामुळे भोग आहेत ते भोगून संपवणे उत्तम. मुलगी शिकलेली  मिळेल , कि गोरी , जवळची मिळेल कि दूरची हे सांगणे कठीण, विवाहयोग आहे कि नाही हे सांगता येयील. शेवटी ज्योतिष हे कालविधान शास्त्र आहे , एखादी घटना कधी घडेल हे ज्ञात होईल इतकेच. प्रश्न विचारणाऱ्या जातकानेही आपण योग्य प्रश्न योग्य वेळीच विचारात आहोत कि नाही ह्याचे भान ठेवले पाहिजे . शाळेत जाणार्या मुलाचा मुलाचा विवाहाचा प्रश्न उचित नाही, येतंय का लक्ष्यात ? त्यामुळे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी दैवी उपायही नसतात . काही गोष्टी आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारावी लागते . ज्योतिषी हा सुद्धा जातक असतोच कि , त्याच्याही आयुष्यात प्रश्न असतात त्यामुळे त्याला जातकाची मानसिकता समजणे फारसे अवघड नसते.

प्रश्न इथून तिथून सारखेच असतात ,आपण जातकाची मानसिकता समजून घेवून त्याला कशी उत्तरे देतो हे त्या क्षणी आव्हान असते .कठीण प्रश्नाचे उत्तर सोपे केले तर जीवनातील आनंद सुद्धा चिरकाल राहील. प्रत्येकाला जगण्यासाठी देवाने काहीतरी चांगले दिले आहे . पत्रिकेतील वर्मावर बोट न ठेवता , त्याला देवाने बहाल केलेल्या अत्यंत उत्तम गुणांची ओळख त्याला ज्योतिषाने करून दिली तर जातक आपले दुक्ख कुरवाळत न  बसता ,उमेदीने आयुष्य जगायला लागेल आणि आपला प्रश्न विसरून जायील . त्याला जगण्याचे नवचैतन्य, दिशा प्राप्त होईल. सहमत? ज्योतिषी तुमचा मित्र किंवा शत्रू नाही आहे तो तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून काम करतोय इतकच.

संपर्क : 8104639230

Web Title: 'The support of a stick to a drowning person' can be said to be 'the support of astrology to a disappointed man'; Because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.