लग्न ठरण्यात अडथळे आणि विलंब होत आहे? हे वास्तु उपाय नक्की कामी येतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:03 PM2021-06-23T12:03:53+5:302021-06-23T12:05:49+5:30
मुला-मुलींच्या विवाहास उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात. याशिवाय बर्याच वेळा सर्वकाही ठीक झाल्यानंतरही ठरलेल्या लग्नात विलंब होतो. अशा परिस्थितीत काही वास्तू टिप्स पाळल्याने त्या अडचणी दूर होऊन लवकरच जीवनसाथी मिळू शकेल.
वास्तु शास्त्रामध्ये योग्य दिशा, ठिकाण आणि त्याचे परिणाम याबद्दल सर्व काही सांगितले गेले आहे. यासह वास्तु टिप्सद्वारे आयुष्यातील अडचणींवर मात करण्याचे मार्ग देखील सांगण्यात आले आहेत. आयुष्यातील अशा मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे विवाहासाठी विलंब किंवा विवाहामधील अडथळे. आज आपण त्या वस्तू आणि परिस्थितीबद्दल माहिती करून घेऊया, ज्यामुळे घरात वास्तु दोष तयार होत आहेत आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. यामुळे विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत.
जाणून घेऊया त्या वास्तू टिप्स -
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या काटेरी वनस्पती ठेवू नका. त्याऐवजी सुंदर फुलगुच्छ, हिरवीगार वेल, हरीत-भरीत झाडांचा वापर करता येईल. या गोष्टींचा प्रभाव मनावर पडून सकारात्मक विचार तयार होतात आणि मनोबल वाढून लग्नकार्याला गती मिळते.
लग्न ठरले आहे पण लांबले आहे, अशा मुला-मुलींच्या खोलीत राधा-कृष्णाचे चित्र लावावे. त्याचा निश्चित सुयोग्य परिणाम होईल.
घराच्या हॉल, ड्रॉईंग रूम किंवा बाल्कनीमध्ये मंद आवाजात संगीत लावा किंवा मंजुळ नाद करणारे हँगिग सुद्धा तुम्हाला लावता येईल. नादमाधुर्य नादलहरी निर्माण करून घराची सकारात्मकता वाढवते.
घराचे पश्चिम आणि वायव्य दिशा स्वच्छ आणि नीट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेत वाढ होते, तसेच विवाहासारख्या मंगल कार्याला गती मिळते.
विवाहात विलंब झाल्याने व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होतो. नैराश्याने मन ग्रासले गेले तर कार्यात आणखी अडथळे निर्माण होतात. यासाठी त्यांचे मन प्रसन्न राहील अशा रीतीने वास्तूत बदल करावेत. मन जेवढे सकारात्मक तेवढ्या अडचणी कमी होत जातील.
ज्या लोकांना लग्न करायचे आहे त्यांनी लग्न ठरेपर्यंत काळ्या रंगाचे कपडे घालणे शक्यतेवढे टाळा. हा रंग राहू, केतु आणि शनि यांचे प्रतिनिधित्व करतो. ज्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात.
विवाहेच्छुक मुलांच्या पलंगाखाली मोठी भांडी किंवा लोखंडी भांडी ठेवल्याने त्यांच्या विवाहात विलंब होतो.
वास्तूचा आपल्या मनस्थीतीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणून वास्तू दोष दूर केले की आयुष्यातील दोष दूर होण्यासही हातभार लागतो, हे कायम ध्यानात ठेवावे.