आनंदी राहण्याचे दोन प्रकार आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:00 AM2021-06-09T08:00:00+5:302021-06-09T08:00:07+5:30

मुळात आनंदी राहायचे आहे, हे आपले ध्येय बनवले पाहिजे. आपला आनंद जेव्हा दुसऱ्यांमध्ये शोधण्याआधी स्वतः मध्ये शोधायला शिकू, तेव्हा निश्चितच आपणही पहिल्या गटातचे सभासद होऊ. 

There are two ways to be happy, which one you relate most? | आनंदी राहण्याचे दोन प्रकार आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?

आनंदी राहण्याचे दोन प्रकार आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?

Next

शीर्षकात म्हटल्याप्रमाणे आनंदी राहण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार सतत आनंदी राहण्याचा आणि दुसरा प्रकार मनासारखे घडले तरच आनंदी राहण्याचा! पैकी पहिल्या प्रकारात मोडणारी मंडळी अगदीच तुरळक असतात. दुसऱ्या प्रकारात मात्र समस्त दुनिया सामावली आहे. त्यामुळेच हे जग दुःखाने भरले आहे. परंतु आपल्याला प्रयत्न करायचा आहे, पहिल्या प्रकारात मोडण्याचा. थोड्याशा सरावाने ते सहज शक्य आहे. 

कारणाशिवाय आनंदी राहता येणे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. 

  • छोट्या छोट्या गोष्टींचा राग राग करणे सोडून द्या.
  • दुसऱ्याला माफ केल्यामुळे तुम्हाला मोठेपणा मिळो न मिळो, तुमच्या मनावरचा बराचसा ताण हलका होतो. तुमचा दिवस आनंदात जातो. 
  • कोणत्याही घटनेची सकारात्मक बाजू पहा. 
  • नकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहू नका. 
  • लहान मुलांशी खेळा, ती सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत असतात. 
  • आवडत्या गाण्यांची यादी करून ठेवा. जेव्हा मूड ठीक नाही असे वाटेल, तेव्हा तुमची आवडती गाणी तुमचा मूड ठीक करतील. 
  • नाचा, खेळा, घाम गाळा. ही त्रिसूत्री नैराश्यावर मात करण्यास प्रचंड प्रभावी ठरते. 
  • आवडत्या व्यक्तीशी बोला, भेटा, अवांतर विषयांवर चर्चा करा. 

  • इंटरनेटवर विविध विषयांवर माहिती उपलब्ध असते, ती ऐकून आपले लक्ष परावर्तित करण्याचा प्रयत्न करा. 
  • दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका, त्याऐवजी स्वतःला नवनवीन टास्क देऊन सतत कार्यमग्न ठेवा. 
  • कामात गुंतलेली व्यक्ती जास्त आनंदी असते, अर्थात हे काम बळे बळे न करता आनंदाने केले पाहिजे. 
  • दिवसभरातुन ५ ते १० मिनिटे तरी आपल्या छंदासाठी राखून ठेवा. छंद आपल्याला चैतन्य देतात. 
  • पाठांतर करा. मेंदू त्यात मग्न राहिला तर दुःखाला किंवा निराशाजनक विचारांना थारा मिळत नाही.

याउपरही आणखी अनेक उपाय आहेत, त्यासाठी मुळात आनंदी राहायचे आहे, हे आपले ध्येय बनवले पाहिजे. आपला आनंद जेव्हा दुसऱ्यांमध्ये शोधण्याआधी स्वतः मध्ये शोधायला शिकू, तेव्हा निश्चितच आपणही पहिल्या गटातचे सभासद होऊ. 

Web Title: There are two ways to be happy, which one you relate most?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.