Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांना पद-प्रतिष्ठा, सूर्य-कृपेचे तेज लाभते; पैसे कमी पडत नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 07:07 AM2023-02-13T07:07:07+5:302023-02-13T07:07:07+5:30
Numerology: या मूलाकांचा स्वामी सूर्य असून, या मूलांकाच्या व्यक्ती प्रभावशाली आणि प्रतिष्ठित असतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या...
Numerology: नियमित कालावधीने ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ग्रहांचे गोचर आणि त्याचा मानवी जीवनावर पडणार प्रभाव याचा अभ्यास करून काही अंदाज बांधले जातात. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. फक्त जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सुमारे एक महिना एक राशीत विराजमान असतो. नवग्रहात सूर्याचा अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. फेब्रुवारी महिन्यात सूर्य कुंभ राशीत विराजमान असेल. कुंभ राशीत नवग्रहांचा न्यायाधीश शनी विराजमान आहे. त्यामुळे पौराणिक कथांनुसार, पिता-पुत्र, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार दोन शत्रू ग्रहांचा युती योग कुंभ राशीतून जुळून येत आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ किंवा २८ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक १ आहे. सूर्य हा मूलांक १ चा स्वामी आहे.
खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्ती मानल्या जातात
अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक १ असतो, त्या खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित मानल्या जातात. मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी रविवार आणि सोमवार हे शुभ दिवस असतात. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो.
चांगले उद्योगपती, पैशाची कमतरता भासत नाही
मूलांक १ असलेल्या व्यक्ती उत्तम उद्योगपती होऊ शकतात. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, भाषणाची क्षमता आणि वेळेची बांधिलकी यामुळे या व्यक्ती व्यापार, व्यवसाय आणि उद्योगात चांगली प्रगती करतात. आपले प्रत्येक काम चोखपणे करतात. मूलांक १ असलेल्या लोकांना सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची सवय असते. तसेच वेळेचे व्यवस्थापन, कौशल्य आणि नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे या व्यक्ती राजकारण, व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पदांपर्यंत जातात. या मूलांकांची आर्थिक स्थिती चांगली असते. पैशाची कमतरता भासत नाही.
निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात
ज्या व्यक्तींचा मूलांक १ आहे, त्या स्वभावाने अतिशय मनमिळावू आणि साध्या असतात. इतकेच नाही तर असे लोक अन्य लोकांशी लवकरच जवळीक वाढवतात. आपल्या गोड बोलण्याने आणि साध्या वागण्याने समोरच्या व्यक्तीचे मन पटकन जिंकतात. या मूलांकाच्या व्यक्ती त्यांच्या कृती आणि बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात. या व्यक्ती प्रामाणिक मानल्या जातात. निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. जीवनात येणाऱ्या अडचणींना ते घाबरत नाहीत, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"