तुळशीशेजारी कधीही ठेवू नका या ५ गोष्टी; धन-संपत्तीवर पडेल प्रतिकूल प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:35 PM2022-12-12T12:35:14+5:302022-12-12T12:42:11+5:30
तुळशीच्या पूजेने जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच तुळस प्रत्येकाच्या घरी असते.
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी स्वतः वास करते असे म्हणतात. त्यामुळे उपवास, सण, शुभकार्यात तुळशीची पूजा केली जाते आणि देवतांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. तुळशीच्या पूजेने जीवनात सुख-समृद्धी येते. तुळस प्रत्येकाच्या घरी असते. मात्र वास्तुनूसार तुळशीजवळ ५ वस्तू कधीही ठेऊ नका, अन्यथा याचा प्रभाव तुमच्या घरात येणाऱ्या संपत्तीवर पडू शकतो.
बूटं आणि चप्पल- वास्तूनुसार तुळशीच्या रोपाजवळ बूट किंवा चप्पल कधीही ठेवू नये. यामुळे तुळशीचा तसेच माता लक्ष्मीचा अपमान होतो. तुमच्या या एका चुकीमुळे देवी माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. म्हणूनच तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
झाडू- भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच त्याची नियमित पूजा खूप फलदायी आहे. तुळशीजवळ झाडू कधीही ठेवू नये असे म्हणतात. यामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचाही अपमान होतो. तुळशीजवळ झाडू ठेवल्याने माणूस गरीब होऊ शकतो. त्यामुळे असे केल्यास आजच आपली ही चूक सुधारा.
शिवलिंग- शिवलिंग तुळशीच्या भांड्यात चुकूनही ठेवू नये. पौराणिक कथेनुसार, तुळशीचे तिच्या मागील जन्मातील नाव वृंदा होते, जी पराक्रमी असुर जालंधरची पत्नी होती. जालंधरला आपल्या सामर्थ्याचा खूप अभिमान होता. या राक्षसाचा वध फक्त भगवान शिवाने केला होता. याच कारणामुळे शिवलिंग तुळशी समूहापासून दूर ठेवले जाते.
काटेरी झाडे- तुळशीचे चमत्कारिक रोप कधीही काटेरी झाडे सोबत ठेवू नये. असे केल्याने अशुभ फळ मिळते. म्हणूनच गुलाब आणि निवडुंग यांसारख्या काटेरी झाडांना त्यापासून दूर ठेवणे चांगले. यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद, भांडण आणि तणावाची समस्या वाढू शकते.
कचरापेटी- तुळशीचे रोप अतिशय पवित्र आहे, त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या भांड्याजवळ कधीही कचरापेटी ठेवू नका. यामुळे घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी पसरते, असं सांगितलं जाते.