आयुष्यात पैशांची कमतरता भासू देत नाहीत 'ही' रत्ने, झटपट श्रीमंत व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:47 PM2022-03-13T17:47:47+5:302022-03-13T17:48:31+5:30

ज्योतिषशास्त्रात सर्व रत्नांचा उल्लेख आहे. ही रत्नं म्हणजे मौल्यवान खडे असतात ज्यांना पैलू देऊन त्यांचं आकर्षक रत्नांमध्ये रुपांतर केलं जातं. ही रत्ने कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात.

These gems uplifts your career remove financial crisis and make you rich in a few days | आयुष्यात पैशांची कमतरता भासू देत नाहीत 'ही' रत्ने, झटपट श्रीमंत व्हाल!

आयुष्यात पैशांची कमतरता भासू देत नाहीत 'ही' रत्ने, झटपट श्रीमंत व्हाल!

Next

ज्योतिषशास्त्रात सर्व रत्नांचा उल्लेख आहे. ही रत्ने म्हणजे मौल्यवान खडे असतात ज्यांना पैलू देऊन त्यांचं आकर्षक रत्नांमध्ये रुपांतर केलं जातं. ही रत्ने कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ज्योतिषी रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. हे रत्न कुंडलीतील कमकुवत ग्रहांना शांत करण्याचे काम करतात, ज्यामुळे त्यांचे शुभ परिणाम मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रात 84 रत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु नऊ ग्रहांनुसार नऊ रत्ने महत्त्वाची मानली जातात. परंतु ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय ही रत्ने कधीही परिधान करू नयेत, अन्यथा विपरीत परिणाम मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जी रत्ने परिधान केली जातात अशा 4 रत्नांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

पन्ना
हे बुधाचे रत्न आहे. पन्ना हा एक अतिशय प्रभावशाली रत्न मानला जातो. यामुळे व्यक्तीची बौद्धिक क्षमता सुधारते, त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते. यातून धनलाभ होतो. पन्ना माणसाचे व्यक्तिमत्व बदलते. त्याला आत्मविश्वास निर्माण करतो. पण जेव्हा तुम्ही पन्ना घालता तेव्हा त्यासोबत मोती, कोरल आणि पुष्कराज कधीही घालू नका. 

नीलम रत्‍न
हे शनीचे रत्न मानले जाते. असे म्हणतात की नीलम इतका शक्तिशाली आहे की तो एखाद्या व्यक्तीला रंकावरुन राजा बनवू शकतो. ते धारण केल्यानंतर काही वेळाने त्याचे शुभ परिणाम मिळू लागतात. पण त्याचे विपरीत परिणामही तितकेच भयानक आहेत. त्यामुळे ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय ते परिधान करण्याची चूक कधीही करू नका. माणिक, प्रवाळ आणि पुष्कराज ही रत्ने कधीही नीलमणी घालू नका.

जेड स्टोन
जेड स्टोन हे नऊ रत्नांपैकी एक नसले तरी ते संपत्ती देणारे रत्न मानले जाते. ते परिधान केल्याने व्यक्तीची एकाग्रता वाढते आणि व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकते. जेड स्टोन विविध प्रकारचे असतात जसे की हिरवा, पिवळा, लाल, काळा, पांढरा आणि पारदर्शक इ. परंतु नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यासाठी हिरव्या रंगाचा जेड स्टोन धारण करावा. 

टायगर रत्‍न
टायगर रत्न देखील नीलम सारखे तात्काळ परिणाम देणारे रत्न मानले जाते. या रत्नाचाही नऊ रत्नांमध्ये समावेश नाही. पण पैशाची कमतरता दूर करण्यासाठीही हे रत्न प्रभावी मानले जाते. हे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सोडवू शकते. ते परिधान केल्याने करिअरची वाढ जलद होते. पण सल्ला न घेता कोणतेही रत्न धारण करण्याची चूक कधीही करू नका.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Web Title: These gems uplifts your career remove financial crisis and make you rich in a few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.