'हे' दहा संकल्प उजळून टाकतील तुमचे जीवन; दिवसातून दोनदा करा उजळणी! - शिवानी दीदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:00 AM2022-06-28T07:00:00+5:302022-06-28T07:00:02+5:30

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. यासाठी पुढील संकल्प-

'These' ten resolutions will brighten your life; Review twice a day! - Shivani Didi | 'हे' दहा संकल्प उजळून टाकतील तुमचे जीवन; दिवसातून दोनदा करा उजळणी! - शिवानी दीदी

'हे' दहा संकल्प उजळून टाकतील तुमचे जीवन; दिवसातून दोनदा करा उजळणी! - शिवानी दीदी

googlenewsNext

'सत्य संकल्पाचा दाता' असे आपण म्हणतो, परंतु आपले संकल्प सिद्धीस जावेत यासाठी त्या संकल्पांची आपण उजळणीच करत नाही. दिवसभर उगाळत बसतो, ते केवळ दुःख, उणिवा आणि कठीण परिस्थिती. काय मिळाले नाही याचा विचार करण्यात जे आहे त्याचाही आपल्याला विसर पडतो. म्हणून दिवसभराची नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवसाची सुरुवात आणि शेवट दहा संकल्पांनी करा, असे ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सुचवतात. 

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. म्हणून कितीही कठीण काळ सुरु असला तरी स्वतःला सकारात्मक ठेवा. कारण वेळ बदलते तशी परिस्थितीसुद्धा बदलते. ही खूणगाठ मनाशी बांधली की अडचणींना सामोरे जाण्याचेही बळ मिळते. यासाठी पुढील संकल्प-

१. मी शक्तिशाली आहे. 
२. मी नेहमी खुश असतो.  
३. मी निर्भयी आहे . 
४. मी शांत आणि स्थिर आहे.  
५. मी निरोगी आहे, मला कसलाही आजार नाही. 

६. माझी सगळी नाती अतूट आहेत.  
७. माझं कुटुंब माझी ताकद आहे.  
८. मी माझं ध्येय गाठणारच.  
९. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करणारच . 
१०. परमात्म्याचे सुरक्षा कवच माझ्या सभोवती आहे. 

दीदी सांगतात, या दहा संकल्पांची उजळणी करण्यासाठी एक मिनीटांपेक्षाही कमी कालावधी लागतो. या संकलपांमध्ये तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे बदल करू शकता. फक्त त्यात सकारात्मक भाव असायला हवा ही मुख्य अट आहे. रोज सकाळी दिवसाला सामोरे जाताना मेंदूला या दहा संकल्पाची आठवण करून द्या. मेंदू या गोष्टींची नोंद घेतो आणि त्यानुसार तुम्हाला सकारात्मक राहण्याचे बळ देतो. हीच सूचना रात्री झोपण्यापूर्वी करा. शांत मनात विचारांचे पडसाद उमटत असतात. हे विचार सकारात्मकच असायला हवेत. त्यानुसार हे सत्यसंकल्प आयुष्याचा एक भाग बनवा आणि प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या!

Web Title: 'These' ten resolutions will brighten your life; Review twice a day! - Shivani Didi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.