पितृदोष, ग्रहदोष दूर करून सुख शांती प्राप्त करण्यासाठी करतात काळ्या तिळाचे दान; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:34 PM2022-01-20T12:34:13+5:302022-01-20T12:34:35+5:30

तिळाचे जितके आरोग्यदायी फायदे आहेत तेवढेच धर्मकार्यातही त्याचा सर्रास वापर केला जातो. चला, जाणून घेऊया तिळाचे चमत्कारिक उपाय. 

They donate black sesame seeds to achieve happiness and peace by removing Pitrudosha and grahdosha; Read more! | पितृदोष, ग्रहदोष दूर करून सुख शांती प्राप्त करण्यासाठी करतात काळ्या तिळाचे दान; सविस्तर वाचा!

पितृदोष, ग्रहदोष दूर करून सुख शांती प्राप्त करण्यासाठी करतात काळ्या तिळाचे दान; सविस्तर वाचा!

Next

सनातन धर्मात काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे. सर्व धार्मिक कार्यात काळ्या तिळाचा वापर केला जातो. तसेच पौर्णिमा व अमावास्येच्या तिथींना तिळाचे दान व तर्पण केले जाते. पितरांच्या नैवेद्यातही तीळ वापरतात. मकर संक्रांतीनिमित्त पांढऱ्या तसेच काळ्या तिळाचे लाडू केले जातात. याशिवाय (आगामी) षटतिला एकादशीला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूला तिळाचे लाडू अर्पण केले जातात. हिवाळ्यात तिळाचे जास्त सेवन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की तिळाचे जितके आरोग्यदायी फायदे आहेत तेवढेच धर्मकार्यातही त्याचा सर्रास वापर केला जातो. चला, जाणून घेऊया तिळाचे चमत्कारिक उपाय. 

ज्योतिषांच्या मते कुंडलीत ग्रहस्थिती अनुकूल नसेल तर करिअर आणि व्यवसायात अडथळे येतात. विशेषत: शनि, राहू आणि केतू यांचे कुंडलीत अयोग्य स्थानी असल्याने करिअरमध्ये खंड पडतो. हा प्रभाव दीर्घकालीन नसतो, परंतु त्याचा परिणाम काही काळासाठी त्रासदायक ठरू शकतो. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष, राहू, केतू किंवा शनी दोष असेल तर दर सोमवार आणि शनिवारी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. त्याचबरोबर जीवनात सुख-समृद्धी येईल.

कधीकधी पितृदोषामुळे जीवनात अस्थिरता येते. वाडवडिलांचे आशीर्वाद राहिल्याने जीवनात सर्व काही प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जर पितृ आनंदी नसतील तर कुटुंबात आणि जीवनात नेहमीच संकटे येतात. पितरांना तृप्त ठेवून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथीला तिळाचे तर्पण करा असे ज्योतिषी सुचवतात . तसेच तिळाचे दान करणे देखील शुभ असते.

करिअरला चांगले वळण देण्यासाठी सूर्य आणि गुरु बलवान राहणे आवश्यक आहे. यासाठी रोज स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि अर्घ्य देण्याच्या पाण्यात चमचाभर काळे तीळ मिसळावे. तसेच शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाने त्यांची पूजा करावी असे सांगितले जाते. तसेच शनिवारी काळ्या तीळाचे दान करणेही फायदेशीर ठरते. 

Web Title: They donate black sesame seeds to achieve happiness and peace by removing Pitrudosha and grahdosha; Read more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.