यंदा उत्सवाला शेगावला जाणे झाले नाही?  मग अशी करा गजानन महाराजांची मानसपूजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:00 AM2022-02-23T08:00:00+5:302022-02-23T08:00:08+5:30

भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे, तो कसा बघावा याचे गजानन महाराजांनी मार्गदर्शन केले आहे. त्यायोगे आपणही करूया मानसपूजा.

This year the do you unable to attend festival at Shegaon? Then do Gajanan Maharaj's Manaspooja! | यंदा उत्सवाला शेगावला जाणे झाले नाही?  मग अशी करा गजानन महाराजांची मानसपूजा!

यंदा उत्सवाला शेगावला जाणे झाले नाही?  मग अशी करा गजानन महाराजांची मानसपूजा!

googlenewsNext

आपण पूजा करतो, ती देवासाठी नाही, तर आपल्या मन: शांतीसाठी. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाचिये द्वारी उभे राहायला दोन क्षणही सवड मिळत नाही. अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता, शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा. यासाठी देवपूजेसाठी करतो, तसाच विधी करावा. मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा. आपल्या हृदयमंदिरात देवाला बसवावे. भक्ती भावाची फुले वाहावीत आणि श्रद्धेचा धूप दीप लावून प्रार्थना करावी. एवढी सोपी आहे मानसपूजा. आज शेगावच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन. यानिमित्ताने अनेक भाविक त्यांच्या दर्शनाला शेगाव संस्थानी आवर्जून जातात. ज्यांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे जमले ते भाग्यवानच पण ज्यांना जाणे जमले नाही त्यांनी पुढीप्रमाणे मनोभावे गजानन महाराजांची आळवणी करा. 

गुरु गजानन सांगे, नाही सक्तीची मूर्तिपूजा,
भाव मनी ठेवून, करा मानसपूजा ।।

गुरु गजानन सांगे, नाही गेलात मंदिरी,
तरी हात जोडा मनोमनी, भक्ती असू द्या अंतरी।।

गुरु गजानन सांगे, नको पूजन अर्चन,
करा माझे स्मरण, करण्या मला आवाहन ।।

गुरु गजानन सांगे, नको पेटवू तो दीप,
सोडा अहंपणा येथ, जाळा मी पणाचा धूप ।।

गुरु गजानन सांगे, नको ती तेलवात,
मोह वासनेची वात, टाळा ओवाळून प्रपंचात ।।

गुरु गजानन सांगे, नसू दे दुर्वा हिरव्या,
नामजपाच्या जुड्या, तुम्ही मला वहाव्या।।

गुरु गजानन सांगे, नको मोदक एकवीस,
करा त्यास अन्नाने तृप्त, जो भुकेने असेल कासावीस।।

गुरु गजानन सांगे, नको पिठले भाकरी,
धावा त्यांच्यासाठी, ज्यांना मदत आहे जरुरी।।

असा माझा गुरु गजानन, आहे भावाचा भुकेला,
नाही कशाचीच अपेक्षा, काव्यपुष्पांनी पुजला।। 

श्री गजानन, जय गजानन।।
गण गण गणात बोते ।।

Web Title: This year the do you unable to attend festival at Shegaon? Then do Gajanan Maharaj's Manaspooja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.