'हे' नवरंग भरतील तुमच्या वास्तूत आणि आयुष्यात नवे रंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:38 PM2021-05-29T12:38:29+5:302021-05-29T12:38:48+5:30

आपल्या दृष्टीला विविध रंग भुरळ पाडतात. ते आपल्या व्यक्तिमत्त्वावर, मनस्थितीवर आणि स्वभावावर परिणाम करतात.

Those nine colors will add new colors to your architecture and life! | 'हे' नवरंग भरतील तुमच्या वास्तूत आणि आयुष्यात नवे रंग!

'हे' नवरंग भरतील तुमच्या वास्तूत आणि आयुष्यात नवे रंग!

googlenewsNext

रंगांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अद्वितीय आहे. रंग नसतील तर आपले आयुष्य कृष्णधवल होईल. अगदी जुन्या काळातील चित्रपटांसारखे. परंतु असे बेरंग आयुष्य कोणाला आवडेल? कोणालाही नाही. एखादा रंग आवडीचा असला, तरी तोच रंग आपण सगळीकडे पाहू शकत नाही. आपल्या दृष्टीला विविध रंग भुरळ पाडतात. ते आपल्या व्यक्तिमत्त्वावर, मनस्थितीवर आणि स्वभावावर परिणाम करतात. याकरिताच वास्तू शास्त्राने देखील नवरंगांचे महत्त्व सांगितले आहे. त्या रंगांचा समावेश आपल्या वास्तू मध्ये केले असता कोणते बदल होतील, ते पहा. 

लाल : हा रंग शक्तिशाली मानला जातो. घरातल्या ज्या खोल्यांमध्ये आपला जास्त वावर असतो अशा जागी किंवा जी आपली व्यायामाची खोली असते, त्या खोलीत लाल रंगाचा वापर करावा. तो रंग परावर्तित होऊन तुमच्या मनस्थितीवर परिणाम साधेल. हा रंग सुख समृद्धीचे प्रतीक असला, तरीदेखील आपल्या शयन खोलीत अर्थात बेड रूम मध्ये हा रंग अजिबात वापरू नये. 

नारंगी : हा रंग अतिशय प्रभावी असतो. विशेषतः देवघरात, हॉल मध्ये किंवा ध्यान धारणेच्या खोलीत या रंगाचा वापर करावा. हा रंग मन एकाग्र करण्यास मदत करतो. बैठकीच्या खोलीत हा रंग वापरल्यामुळे वातावरणात चैतन्य राहते. मनोबल वाढते. म्हणून घरात रंग बदल करायचा विचार आल्यास या रंगाची निवड आधी करावी. 

पिवळा : हा रंग प्रकाशाला परावर्तित करून घरात भरपूर उजेड आणतो. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. फिकट पिवळ्या रंगामुळे ऊर्जा निर्माण होते. बैठकीच्या खोलीत विशेषतः हा रंग अवश्य वापरावा. परंतु गडद पिवळा रंग न वापरता हळदी पिवळा, फिकट पिवळा या रंगांनी अचूक परिणाम साधला जातो. 

पोपटी : हिरवा पोपटी रंग नजरेला तजेला देतो आणि डोळ्यांना शांतता देतो. रंगांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर देखील होतो. पोपटी हिरव्या रंगामुळे मन शांत राहते. म्हणून घरातल्या सगळ्या भिंतींवर हा रंग न देता एखादी तरी भिंत हिरव्या रंगाची जरूर असावी. 

निळा : हा रंग सुरक्षेची भावना निर्माण करतो. तो सत्याचेही प्रतीक आहे. चिंतन, मनन, अभ्यास यासाठी निळ्या रंगाचा वापर केला असता या रंगाचा हमखास परिणाम होतो. गडद निळा रंग गूढ रात्रीसारखा शांत असतो. परंतु अशा रंगामुळे उद्विग्न मन शांत होते. विचार चक्र थांबते आणि रात्रीनंतर येणाऱ्या सूर्योदयासाठी सज्ज होते. म्हणून आपल्या घरातला निवांत कोपरा निळ्या रंगाचा असावा. 

जांभळा : धर्म आणि आध्यात्म यांचा समावेश करायचा असेल, तर जांभळ्या रंगाचा वापर करावा. कारण हा रंग धर्म आणि अध्यात्माला हा रंग पोषक समजला जातो. म्हणून या रंगाचा वापर देवघरासाठी करावा. या रंगामुळे आयुष्यात येणाऱ्या दुःखाशी सामना करण्याचे बळ मिळते. 

पांढरा : वास्तूच्या दृष्टीने हा रंग अतिशय योग्य आहे. हा रंग मळखाऊ असल्याने लोक या रंगाचा वापर टाळतात परंतु या शुभ्र रंगामुळे घराची खोली ठळकपणे जाणवते. पांढऱ्या रंगाला पांढऱ्या पडद्यांची जोड दिली की वातावरण प्रसन्न वाटते. अनेकांना हा रंग फिका वाटतो किंवा काही जणांना दवाखान्याची आठवण करून देणारा वाटतो. परंतु, त्याला पर्याय म्हणून क्रीम कलर अर्थात सायीसारखा फिकट पिवळा रंग असलेला पांढरा रंग वापरावा. 

गुलाबी : पांढऱ्या रंगाला आणखी एक पर्याय म्हणून फिका गुलाबी रंग वापरता येऊ शकतो. हा रंग डोळ्यांना तजेलदार आणि शांतता देणारा आहे. याउलट गडद गुलाबी रंगाचाही काही ठिकाणी वापर केला जातो. परंतु तो रंग फिकट गुलाबी रंगाइतका आल्हाददायक वाटत नाही. म्हणून वास्तू शास्त्रज्ञ फिकट रंगांचा अधिक वापर करण्याचा सल्ला देतात. 

Web Title: Those nine colors will add new colors to your architecture and life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.