गुरुने दिला ज्ञानरूपि वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:23 PM2020-12-25T19:23:23+5:302020-12-25T19:23:38+5:30

नुसते आध्यात्मच नाही तर संत एकनाथांसारखे आम्ही विरतेचे प्रतीक युद्धशस्त्र व शास्त्र शिकून शूरता, वेळ प्रसंगी दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही. कारण मातृभूमी प्रथम. म्हणजे आमच्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी बघणार नाही. विद्वान, सज्जन यांची नम्रतेने पूजन करू व त्यांचे चांगले गुण आत्मसात करू, त्यांचे संवर्धन करू.

The thought given by the Guru form of knowledge, we will carry on this legacy. | गुरुने दिला ज्ञानरूपि वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।

गुरुने दिला ज्ञानरूपि वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।

googlenewsNext

रवींद्र वासुदेव गाडगीळ

आम्ही चालवू हा ज्ञानरूपी वारसा. गुरु हेच कल्पवृक्ष आहेत. त्यांना आपण काहीही मागू शकतो आणि ते आपल्याला मिळतेही अर्थात आपली कुवत, पात्रता, वकुब सिद्ध करून दाखविल्यावरच. म्हणून तर अथर्व शीर्षाच्या फलादेशात मुद्दामहून दिलेले आहे “अशिष्याय न देयम, यो यदी मोहाद्दास्यपी सपापीयान भवति". सूरी, चाकू, बंदूक, बाईक, मोबाईल, माचिस जशी छोट्या मुलांच्या हातात दिली तर अनर्थ घडेल.

विज्ञानाचेही तसेच आहे. सुशिक्षित म्हणवणारे तरुण तालीबानी, अतिरेकी, नक्षली बनत आहेत. कारण अयोग्य व्यक्तीच्या हाती अयोग्य वस्तु पडत आहेत. योग्य वेळी योग्य गुरूंनी योग्य शिष्यालाच योग्य वेळी हा वारसा दिला पाहिजे. त्याला खात्री पाहिजे. आत्मविश्वास, त्याग, सेवा, राष्ट्रनिष्ठा, धर्मप्रेम, समाजप्रेम हे त्याचे अंगी पाहिजे.

हेही वाचा : रोज सकाळी उठून कराव्यात अशा पाच मुख्य गोष्टी, सांगताहेत गौर गोपाल दास!

गुरुने दिला ज्ञानरूपि वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।। 
पिता बंधु स्नेही, तुम्ही माउली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, 
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा ।। 
जिथे काल अंकुर बिजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, 
फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा ।। 
शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्येसवे नम्रता, 
मनी ध्यास हा एक लागो असा ।। 
जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, 
मनी, मानसी हाच आहे ठसा ।। 
तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी किर्ति राहील दाही दिशी, 
अगा पुण्यवंता भल्या माणसा ।।

कविवर्य श्री जगदीश खेबुडकर यांनी बाल संस्कार म्हणून हे आश्वासक शब्द गुंफले आहेत, की ज्यातून शिष्य स्वतः बद्दल खात्री देत आहेत, की आपण दिलेले ज्ञान हे योग्य व्यक्तीच्या हाती सोपवले गेले आहे. आपण निश्चिंत रहा. या गीताला संगीत दिले आहे, श्री प्रभाकर जोग आणि गायले अनुराधा पौंडवाल व सुरश्री सुरेश वाडकर यांनी. 'कैवारी” ह्या चित्रपटातील हे गीत.

“इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” ही तुमची गुरुकृपा. आपणच आमच्या मनाची मशागत केलीत व आत्मविश्वासाचे, विकासाचे बीज पेरलेत आणि प्रेमाचे, शिस्तीचे खत पाणी वेळेवेळी सिंचन केलेत म्हणून तर हा वेलू गेला हा विशाल आकाशात झेप घेत भरारी मारण्यासाठी.  हा अभंग ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या गुरु निवृत्तींनाथांकडून ज्ञान प्राप्ती झाल्यावर जो "अमृतानुभव" अनुभवला तेंव्हा हा अभंग त्यांना स्फुरला. जणू ज्ञान प्रकाशाचा मोगरा फुलला आणि विश्वभर त्याचा सुगंध पसरला.

नुसते आध्यात्मच नाही तर संत एकनाथांसारखे आम्ही विरतेचे प्रतीक युद्धशस्त्र व शास्त्र शिकून शूरता, वेळ प्रसंगी दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही. कारण मातृभूमी प्रथम. म्हणजे आमच्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी बघणार नाही. विद्वान, सज्जन यांची नम्रतेने पूजन करू व त्यांचे चांगले गुण आत्मसात करू, त्यांचे संवर्धन करू. आपली ही चांगली शिकवण आम्ही आमच्या कर्तुत्व, दातृत्व, नेतृत्व यातून दाही दिशेने जगभर आपले नाव गाजवू. आपण आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करू. खरोखरीच आम्ही भाग्यवंत, आपणासारीखे पुण्यवंत आमचे गुरु आम्हाला लाभले.   
श्री गुरु देव दत्त. 

हेही वाचा : वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Web Title: The thought given by the Guru form of knowledge, we will carry on this legacy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.