लोकहो, आज कांदेनवमी: कांदे भाजी खाण्याचा ऑफिशियल दिवस? पण आजच का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 05:15 PM2023-06-27T17:15:05+5:302023-06-27T17:16:59+5:30

पाऊस, कांदे भजी आणि आल्याचा फक्कड चहा, हे तर पावसाळी समीकरणच; पण त्यासाठी आजच्या दिवसाची निवड का ते वाचा आणि भजीचा आनंद घ्या!

Today is Kandenavami: the official day of eating onion pakoda? But why today? Read on! | लोकहो, आज कांदेनवमी: कांदे भाजी खाण्याचा ऑफिशियल दिवस? पण आजच का? वाचा!

लोकहो, आज कांदेनवमी: कांदे भाजी खाण्याचा ऑफिशियल दिवस? पण आजच का? वाचा!

googlenewsNext

आज आषाढ शुद्ध नवमी, आजची तिथी कांदेनवमी म्हणून ओळखली जाते. कारण इथून पुढे म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास सुरू होणार असतो. या महिन्यात कांदा लसूण वर्ज्य केले जाते. म्हणून चातुर्मासाआधी ते संपवण्याची केलेली तजवीज म्हणजे कांदेनवमी. 

धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. चातुर्मासात दरदिवशी काही ना काही व्रत वैकल्ये असतात. त्यात यंदा अधिक श्रावण मास, म्हणजे श्रावणाच्या आधी अधिक महिना येतोय. तो महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्या काळात तर अजिबातच कांदा, लसूण वापरत नाहीत आणि जोडून येणाऱ्या श्रवणातला तर प्रत्येक दिवस महत्त्वाचा! अशा वेळी घरात कांदे भरून ठेवले तर पावसाळी वातावरणात ते कुजून जातील आणि घरात दुर्गंध पसरेल, म्हणून पूर्वीचे लोक नवमीच्या तिथीला घरातील कांदा लसूण संपवून टाकत असत. 

मात्र सद्यस्थितीत म्हणाल, तर कांदा-लसणाशिवाय आपले पान हलत नाही. चमचमीत पदार्थ करायचे झाले की त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे त्यांना शरण जाणे ओघाने आलेच. त्यामुळे कांदेनवमीला कांदे भजीचा फडशा पाडून परत कांदा लसूण खाणारे लोक आहेच. अशावेळी किमान सणवारी पथ्य पाळावे असा नेम आपण नक्कीच करू शकतो. आपल्या सणांचे पावित्र्य आपण जपले नाही तर पुढच्या पिढीला कोण या गोष्टींचे महत्त्व सांगणार?

त्यामुळे आपणही काही पथ्य, नियम स्वतःला लावून घेऊया, आपल्या धर्मसंस्कृतीचे पालन करूया आणि कांदेनवमी मजेत साजरी करूया!

Web Title: Today is Kandenavami: the official day of eating onion pakoda? But why today? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न